शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट फोन’ने घटली बोगस लाभार्थींची संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 05:34 IST

अंगणवाड्यांमधून पोषण आहार मिळणाऱ्या ६ वर्षांपर्यंतच्या बालकांची संख्या १ जुलैपासून अचानक घटली आहे.

- मनोज ताजने गडचिरोली : अंगणवाड्यांमधून पोषण आहार मिळणाऱ्या ६ वर्षांपर्यंतच्या बालकांची संख्या १ जुलैपासून अचानक घटली आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या हाती आलेले ‘स्मार्ट फोन’ कारणीभूत ठरले आहेत. प्रत्यक्षात लाभार्थी पूर्वी होते तेवढेच आहेत, पण बोगस लाभार्थी दाखवून आहाराचे अनुदान लाटण्याच्या प्रकाराला स्मार्ट फोनमधील विशेष फिचरमुळे ब्रेक लागला आहे.आतापर्यंत रजिस्टरवर नमूद केलेल्या सर्व लाभार्थींना आहार पुरविल्याचे दाखविले जात होते. पण आता लाभार्थी मुलगा अंगणवाडीत आला का, आणि त्याला आहार देण्यात आला का याची दैनंदिन माहिती स्मार्ट फोनवरून महिला व बालविकास विभागाला द्यावी लागत आहे. त्या माहितीची खात्री करण्यासाठी बालकाच्या पालकाला फोनही केला जात आहे. त्यामुळे अंगणवाड्यांमधील बोगस लाभार्थींना ब्रेक लागला आहे. यातून आहार पुरवठ्यातील गडबडही नियंत्रणात येत आहे.बालकांसह दुर्गम भागात गरोदर व स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींनाही पोषण आहार देण्याची केंद्र व राज्य सरकारची योजना आहे. राज्यभरात असलेल्या अंगणवाड्यांच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वेगवेगळा आहार दिला जातो. त्या आहार पुरवठ्याची जबाबदारी शासनाने नेमलेल्या वेगवेगळ्या एजन्सींकडे असली तरी त्यांची नोंद ठेवून बिल मंजूर करण्याचे काम तालुकास्तरावरील बालविकास प्रकल्प अधिकारी करतात. आतापर्यंत अनेक अंगणवाड्यांमध्ये रजिस्टरवर बोगस लाभार्थी दाखविले जात होते. त्यांच्या नावावर आहार पुरविल्याचे दाखवून जास्त पैसे लाटले जात होते. मात्र आता दैनंदिन आहार वाटपाची माहिती अ‍ॅपमधून भरणे सक्तीचे करण्यात आले आहे.>दुर्गम भागात अजूनही बोगसपणाला वावगडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश दुर्गम भागात मोबाईल व इंटरनेटचे पुरेसे कव्हरेज नाही. अशा स्थितीत अंगणवाडी सेविकांना दिलेल्या स्मार्ट फोनवरून दैनंदिन माहिती अपडेट करणे अशक्य झाले आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास या जिल्ह्यात आहार पुरवठ्यातील गडबड दूर होऊ शकणार नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्हा मोबाईल नेटवर्कच्या कक्षेत येण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करण्याची गरज आहे.