लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : नगर पंचायतमध्ये सुरुवातीपासून कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी केली आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन सुद्धा डॉ. उसेंडी यांनी दिली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील तालुकास्थळावरील १० मुख्यालयामध्ये नगर पंचायतीमध्ये रूपांतर करण्यात आले. ग्रामपंचायत असतेवेळी एकूण १५० कर्मचारी कार्यरत होते. नियमानुसार या कर्मचाºयांना नगर पंचायतीच्या सेवेत सामावून घेणे आवश्यक असतानाही विविध कारणे दाखवून १३५ कर्मचाºयांना शासनाने डावलले आहे. केवळ १५ कर्मचाºयांचे समायोजन केले आहे. याबाबत जिल्हाभरातील नगर पंचायत कर्मचाºयांनी आंदोलन सुरू केले आहे.डॉ. उसेंडी यांनी गुरूवारी चामोर्शी नगर पंचायत कर्मचाºयांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली. यावेळी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हा महासचिव प्रभाकर वासेकर, निशांत नैताम, सुरेश भांडेकर, वैभव भिवापुरे उपस्थित होते.
न.पं. कर्मचाºयांना स्थायी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:44 IST
नगर पंचायतमध्ये सुरुवातीपासून कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी केली आहे.
न.पं. कर्मचाºयांना स्थायी करा
ठळक मुद्देनामदेव उसेंडी यांची मागणी : चामोर्शीतील आंदोलनस्थळाला भेट