शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आता खेडेगावातही कॅशलेस व्यवहारांना वाढली पसंती; छोट्या विक्रेत्यांकडेही स्मार्ट पेमेंटची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 14:14 IST

Gadchiroli : छोट्या विक्रेत्यांकडेही स्मार्ट पेमेंटची सुविधा उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : संपूर्ण देशात डिजिटल पेमेंट इको सिस्टिममुळे आपल्या रोजच्या जगण्यातील व्यवहाराची पद्धत बदलली आहे. शहराप्रमाणेच तालुक्याच्या ग्रामीण भागातील चहा, किराणा दुकान, भाजीपाला, भंगारवाला, चायनीज कॉर्नर, इतर व्यवसाय किंवा मोठ्या शोरूममध्येही 'यूपीआय'द्वारे ऑनलाइन व्यवहार होत असल्याचे दिसून येत आहे.

व्यवहारातील साध्या एक रुपयापासून हजारो रुपयांचे व्यवहार स्मार्ट पेमेंटद्वारे कॅशलेस करत आहेत. त्यामुळे घरात किंवा खिशातदेखील रोख रक्कम ठेवणे नागरिक टाळत असल्याचे दिसून येत आहे. शहरासह ग्रामीण परिसरात सुट्या पैशांचे टेन्शन मिटले आहे. छोट्या विक्रेत्यांकडेही स्मार्ट पेमेंटची सुविधा उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागात आधारकार्डवरून बँकेतील पैसे काढून दिले जातात; परंतु घरात मोबाइल सुविधा असल्याने वीज मीटरचे बिल, टेलिफोन बिल, ट्रॅव्हल कंपन्यांचे, विमानाचे, रेल्वेचे तिकीट, सिलिंडरची रक्कमदेखील ऑनलाइन व्यवहारांद्वारे स्वीकारण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर ग्रामीण परिसरातील चहा, किराणा दुकान, भाजीपाला, भंगारवाला, चायनीज कॉर्नर, इतर व्यवसायांसाठी वापर वाढला आहे. परिणामी, सुट्या पैशांचे टेन्शन दूरच झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ऑनलाइन खरेदी विक्री वाढली असून या व्यवहारातही कॅशलेस व्यवहार केला जात आहे, ऑनलाइनरित्या एखादी वस्तू प्राप्त झाल्यानंतर त्याचे पेमेंट ऑनलाइन अदा केले जात आहे. 

काय आहे 'यूपीआय'? यूपीआय' ही भारतीय पेमेंट सिस्टिम आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीने ते विकसित केले आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे पेमेंट करण्यासाठी ओटीपीची गरज नाही. तुम्ही फक्त पिन टाकून, कोड स्कॅन करून सहज पेमेंट करता येते. त्यामुळे बहुतांश जण 'यूपीआय'चा वापर करत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली