शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

आता लक्ष्य ओबीसींचे राजकीय आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 05:00 IST

ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्ही प्रामाणिक होतो म्हणून हा निर्णय घेऊ शकलो; पण मागच्या सरकारने केवळ भूलथापा देऊन हा विषय टोलवला. गडचिरोली जिल्ह्यात आता ओबीसी आरक्षण ६ वरून १७ टक्के झाल्याने वर्ग ३ आणि ४ मधील विविध १४ प्रकारच्या पदभरतीत जिल्ह्यातील ओबीसी युवकांना आरक्षणाचा लाभ होईल.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी बांधवांसह कोणाचाही हक्क हिरावून न घेता ओबीसींना त्यांचा हक्क मिळवून दिल्याचे समाधान आहे. त्यामुळे ओबीसींच्या हक्काच्या लढाईत हा ऐतिहासिक दिवस ठरला. आपण पुढेही ओबीसींच्या हक्कासाठी लढत राहू, असे सांगत यापुढील लक्ष्य ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून देणे हे आहे, असे वक्तव्य बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे जाहीरपणे केले. राज्य सरकारने गट ‘क’ आणि ‘ड’च्या पदभरतीसाठी ८ जिल्ह्यांमधील ओबीसी आरक्षण वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर वडेट्टीवार यांचे शुक्रवारी (दि. १७) गडचिरोलीत आगमनानिमित्त जल्लोषात स्वागत करण्यात आले. ओबीसी समाजबांधवांच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौकात संध्याकाळी आयोजित स्वागत सोहळ्यात वडेट्टीवार बोलत होते.या वेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आदिवासीबहुल भागात ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढविण्याचा निर्णय घेण्यासाठी अनेक वेळा कॅबिनेटपुढे हा विषय आणला. ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्ही प्रामाणिक होतो म्हणून हा निर्णय घेऊ शकलो; पण मागच्या सरकारने केवळ भूलथापा देऊन हा विषय टोलवला. गडचिरोली जिल्ह्यात आता ओबीसी आरक्षण ६ वरून १७ टक्के झाल्याने वर्ग ३ आणि ४ मधील विविध १४ प्रकारच्या पदभरतीत जिल्ह्यातील ओबीसी युवकांना आरक्षणाचा लाभ होईल.या वेळी आ. अभिजित वंजारी यांनीही मार्गदर्शन केले. या स्वागत सोहळ्याला माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, ओबीसी महासंघाचे शेषराव येलेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि.प. अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, हसनअली गिलानी, वामन सावसाकडे, अतुल मल्लेलवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, डी.डी. सोनटक्के, कुणाल पेंदोरकर आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागतपर रॅलीत सहभागी झालेले पदाधिकारी व कार्यकर्ते काही प्रमाणात मास्क लावून तर काही विनामास्क हाेते. बहुतांश लाेकांमध्ये काेराेनाची भिती नव्हती.

रथाने वेधले लक्ष वडेट्टीवार यांचे आरमोरीमार्गे गडचिरोलीत आगमन झाल्यानंतर त्यांना रथावर चढवून इंदिरा गांधी चौकापर्यंत वाजतगाजत आणण्यात आले. या वेळी ‘जय ओबीसी’ लिहिलेल्या पिवळ्या टोप्या डोक्यावर चढविलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष आणि जयघोष केला जात होता.घटनादुरुस्तीसाठी केंद्राकडे मागणीओबीसींचे हे आरक्षण मर्यादित आहे. राजकीय आरक्षणासह पूर्ण आरक्षणाचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने १०२ वी घटनादुरुस्ती करणे गरजेचे आहे. आरक्षण ५० टक्क्यांच्या वर नको, अशी ग्यानबाची मेख मारून ठेवली असल्यामुळे अनुसूचित जमाती क्षेत्रात ओबीसी आरक्षणाचा पूर्णपणे लाभ देताना अडचणीचे जाऊ शकते. त्यामुळे कलम २४३ सी आणि बी मध्ये योग्य तो बदल करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार असल्याचे या वेळी वडेट्टीवार म्हणाले.

 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार