आता एका दिवसात परत येणाऱ्यांचेही विलगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:00 AM2020-07-08T05:00:00+5:302020-07-08T05:00:35+5:30

गेल्या ३ मे पासून वाहतूक परवान्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ४८ हजार ६९७ अर्ज आले आहेत. त्यापैकी २१ हजार ११२ अर्जांना परवानगी देण्यात आली, तर २७ हजार ५८५ अर्ज नामंजूर करून वाहतुकीसाठी परवानगी नाकारण्यात आली. आता कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे याबाबतचे नियम आणखी कडक करण्यात आले आहेत.

Now the separation of those who come back in one day | आता एका दिवसात परत येणाऱ्यांचेही विलगीकरण

आता एका दिवसात परत येणाऱ्यांचेही विलगीकरण

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : रूग्ण वाढल्याने कडक अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्यात जाऊन त्याच दिवशी परत येणाºयासही आता गृह किंवा संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. या आदेशांचे पालन न करणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.
लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नाक्यांवरही नियम थोडे शिथील करण्यात आल्याचे दिसत होते. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसोबत रोटीबेटीचे व्यवहार आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात जाणाºयांना नाक्यांवर थोडी शिथिलता दिली जात होती. मात्र गडचिरोली जिल्ह्यात आता कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रवासाचे नियम सुध्दा कडक केले आहेत.
बाहेर जिल्ह्यातून विनापरवाना गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनावर १ लाख रुपये तर व्यक्तीवर ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा आदेश यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. याची कडक अंमलबजावणी आता केली जाणार आहे. प्रशासनातर्फे दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास पुन्हा संचारबंदी लागू केली जाईल, असा इशारा सुध्दा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

२७ हजार ५८५ जणांना नाकारला प्रवेश
गेल्या ३ मे पासून वाहतूक परवान्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ४८ हजार ६९७ अर्ज आले आहेत. त्यापैकी २१ हजार ११२ अर्जांना परवानगी देण्यात आली, तर २७ हजार ५८५ अर्ज नामंजूर करून वाहतुकीसाठी परवानगी नाकारण्यात आली. आता कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे याबाबतचे नियम आणखी कडक करण्यात आले आहेत. खोटे कारण देऊन पास मिळवल्याचे लक्षात आल्यास त्याच्यावर पोलीस कारवाई होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

चेक पोस्टवरील कर्मचाऱ्यांसोबत वाद घातल्यास कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आरोग्य विभागामार्फत गृह विलगीकरण किंवा संस्थात्मक विलगीकरणासाठी हातावर शिक्का मारला जाते. मात्र यावेळी काही प्रवाशी चेक पोस्टवरील वैद्यकीय पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद घालत असल्याचे दिसून आले आहे. अशा प्रवाशावर यापुढे कारवाई केली जाईल. गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय किंवा प्राथमिक केंद्रात जाऊन वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. चोरून लपून जिल्ह्याच्या हद्दित प्रवेश करणाऱ्यांवर पोलीस कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Now the separation of those who come back in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.