शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

६०० वर गावांत आता मिळणार सुपर फास्ट इंटरनेटची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 16:04 IST

डीजीटलायझेशनवर भर : केंद्र सरकारच्या योजनेची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : केंद्र व राज्य सरकारच्या वतीने गेल्या चार-पाच वर्षांपासून डिजीटल धोरण अवलंबिले जात असून बहुतांश कामे ऑनलाइन करण्यात आली आहेत. दरम्यान, गावपातळीवरही ऑनलाइन कामे पार पडावी, यासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून ग्रामपंचायतींना सुपर फास्ट इंटरनेट देण्याची योजना अंमलात आणण्यात आली आहे.

सदर योजनेच्या माध्यमातून प्रशासनाच्या पुढाकाराने बीएसएनएल व इतर कंत्राटदाराच्या सहाय्याने ग्रामपंचायतीमध्ये सुपर फास्ट इंटरनेट बसविण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील सहा तालुक्यातील ६०० पेक्षा अधिक गावात सुपर फास्ट इंटरनेट सुविधा आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, सिरोंचा, भामरागड, कोरची आदी तालुक्यात सुपर फास्ट इंटरनेटची सुविधा होणार आहे. याचे काम जिल्हा प्रशासनाच्या वतीने सीएससी एजन्सीमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

ऑप्टीकल फायबरने ५५० गावे जोडली बीएसएनएलच्या माध्यमातून ऑप्टीकल फायबर सेवेतून जिल्ह्याच्या उत्तर भागातील जवळपास ५५० गावे इंटरनेट सुविधेने जोडण्यात आली आहे. या गावांमध्ये आता ऑनलाइन सातबारा, विविध प्रमाणपत्र उपलब्ध होत आहे. ग्रामपंचायतमध्ये कार्यरत ऑपरेटर नागरिकांची ऑनलाइन कामे पूर्ण करीत आहे. गावातच दाखल मिळत असल्याने पायपीट थांबली आहे.

कोरची भागात केव्हा मिळणार इंटरनेट स्पिड जिल्ह्याच्या उत्तर भागातील कोरची तालुक्यात अजूनही सुपर फास्ट इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. परिणामी इंटरनेट कनेक्टिव्हीटीची मोठी समस्या या भागात भेडसावते. प्रशासनाने सीएससी एजन्सीच्या माध्यमातून सुविधा करावी.

गावपातळीवरील पाच कार्यालयांना सुविधा

  • ग्रामपंचायतीच्या गावात असणाऱ्या पाच कार्यालयांना ग्रा.पं.च्या माध्यमातून इंटरनेट सुविधा देण्याची गरज आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, पोलिस मदत केंद्र, तलाठी कार्यालय व वनपरिक्षेत्र कार्यालयांचा समावेश आहे. 
  • सदर कार्यालयाचे ऑनलाइन कामकाज थांबू नये, कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी ऑप्टीकल फायबरच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

गतिमुळे दस्तावेज अपलोड ग्रामपंचायत कार्यालयात फायबर केबलच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. येथे स्पिडने इंटरनेट मिळत असल्यामुळे विविध दाखले तसेच दस्तावेज अपलोड करणे शक्य होते, असे बीएसएनएलच्या सुत्रांनी सांगितले.

४०० ग्रा.पं. मध्ये आहे इंटरनेट वर्षभरापूर्वी बीएसएनएलच्या माध्यमातून उत्तर भागातील सहा तालुक्यांत ऑप्टीकल फायबर केबलची जोडणी करण्यात आली. या माध्यमातून गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा या तालुक्यांच्या ४०० ग्रा.पं. मध्ये स्पिडने इंटरनेट सेवा सुरू आहे.

 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीInternetइंटरनेट