शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

आता गोसेखुर्दमुळे पूरपरिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

वैनगंगा नदीकडे जाणारा एक ओढा देसाईगंज शहरातील हनुमान वार्डाजवळून वाहतो. मागील पाच-सहा वर्षात या ओढ्याच्या किनाऱ्यावर प्रचंड वस्ती वाढली. मंगळवारी वैनगंगेला आलेल्या पुरामुळे सदर ओढ्याला दाब निर्माण होऊन ओढ्याच्या किनाऱ्यावर बांधलेल्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

ठळक मुद्देवैनगंगेचे पाणी देसाईगंज शहरात : अनेक मुख्य मार्ग पुन्हा अडले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रविवारी रात्री १०.३० वाजता गोसेखुर्द धरणााचे २२ दवाजे एक मीटरने व ११ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. त्यानंतर सोमवारी सकाळी ७.३० वाजता २२ दरवाजे दोन मीटरने व ११ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले. गोसेखुर्द धरणाचे पाणी देसाईगंज तालुक्यात १२ तासाने व गडचिरोली तालुक्यात १८ तासाने पोहोचले. या पाण्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी पूर परिस्थिती निर्माण झाली. वैनंगेच्या उपनद्यांना दाब आल्याने देसाईगंज, चामोर्शी, आरमोरी, आष्टी, गोंडपिपरी हे प्रमुख मार्ग बंद पडले होते. चार दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे पूर आला होता. आता पावसाने थोडीफार उसंत घेतली आहे. मात्र आता गोसेखुर्दच्या पाण्याने पूर आला आहे. सततच्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.मध्यप्रदेशातील संजय सरोवराचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे वैनगंगेच्या पाण्याची पातळी वाढून भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्प सुध्दा ओव्हर फ्लो झाले आहे. सोमवारी सकाळी ७.३० वाजता गोसेखुर्द धरणाचे २२ दरवाजे दोन मीटरने तर ११ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले होते. त्यावेळी १२ हजार ६८२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. पुन्हा सकाळी ८.१० वाजता संपूर्ण ३३ दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले होते. त्यावेळी १३ हजार ७३९ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. सकाळी सोडलेले पाणी सायंकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात पोहोचले. वैनगंगेला लागून अनेक उपनद्या आहेत. वैनगंगा दुथडी भरून वाहू लागल्याने उपनद्यांचे पाणी वैनगंगेत प्रवाहीत होण्यास अडचण निर्माण होऊ लागले. परिणामी उपनद्यांना दाब येऊन पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही ठेंगण्या पुलावरून पाणी असल्याने जिल्ह्यातील प्रमुख मार्ग बंद पडले होते. मंगळवारी सायंकाळी ५.१५ वाजता ३३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे.देसाईगंजात शिरले पाणीवैनगंगा नदीकडे जाणारा एक ओढा देसाईगंज शहरातील हनुमान वार्डाजवळून वाहतो. मागील पाच-सहा वर्षात या ओढ्याच्या किनाऱ्यावर प्रचंड वस्ती वाढली. मंगळवारी वैनगंगेला आलेल्या पुरामुळे सदर ओढ्याला दाब निर्माण होऊन ओढ्याच्या किनाऱ्यावर बांधलेल्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पुराचे पाणी घरांमध्ये शिरण्याचा अंदाज पोलीस व आपत्ती व्यवस्थापन विभागाला आल्याने तहसीलदार डी.टी. सोनवाने, ठाणेदार प्रदीप लांडे यांनी या घरांमधील नागरिकांना रात्रीच जवळपासच्या समाज मंदिरात हलविण्यात आले. पुरामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, मोठा पूर आल्यानंतर या ओढ्याला नदीची दाब येते. मात्र काही नागरिकांनी ओढ्यावरच घरे बांधली आहेत. हा दोष निसर्गाचा नसून नागरिकांचा आहे.बंद असलेले मार्गपाल नदीवरील पुलामुळे आरमोरी मार्ग बंद आहे. शिवणी नाल्यावरील पाण्यामुळे गडचिरोली-चामोर्शी मार्ग बंद आहे. वैनगंगा पुलावरील पाण्यामुळे आष्टी-गोंडपिपरी, कढोली-अनखोडा हे मार्ग मंगळवारी दिवसभर बंद होते. बुधवारी सायंकाळपर्यंत पूर ओसरण्याची शक्यता आहे.दोघांना वाचविलेतामिळनाडू राज्यातील सेलबान विरप्पन व मधुस्वामी सुयकला हे दोन व्यक्ती गोविंदपूर नाल्यावरील पुरात अडकली असल्याची माहिती कंट्रोल रूमला प्राप्त झाली. त्यानुसार गोविंदपूर नाल्याकडे बचाव पथक पाठविण्यात आले. या पथकाने दोघांनाही सुखरूप बाहेर काढले.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पfloodपूर