शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये आता कंत्राटी शिक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 15:13 IST

जि.प. मध्ये हालचाली : डीएड, बीएडधारकांकडून मागविले अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सन २०२३-२०२४ च्या संचमान्यतेनुसार १० आणि १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील दोनपैकी एका रिक्त पदावर डी.एड., बी.एड. अर्हताधारक उमेदवारास तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षक पदावर नियुक्ती देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने हालचाली वाढवल्या असून कंत्राटी शिक्षक भरतीसाठी डीएड, बीएडधारकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

२३ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णय व शिक्षण सहसंचालक, शिक्षण आयुक्तालय. पुणे यांच्या ७ ऑक्टोबर रोजीच्या पत्रातील निर्देशानुसार सन २०२३-२०२४ च्या संचमान्यतेनुसार ज्या जि. प. शाळांची पटसंख्या १० आणि १० पेक्षा कमी आहे, अशा शाळेतील शिक्षकांच्या दोनपैकी एका रिक्त पदावर डी.एड., बी.एड. अर्हताधारक उमेदवारास तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षक पदावर नियुक्ती देण्यात येणार आहे. 

सदर उमेदवाराची निवड करताना उमेदवार संबंधित शाळेच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्थानिक रहिवासी असावा, असे निर्देश आहेत. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक डीएड, बीएडधारक उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. 

१० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत अगदी तात्पुरत्या स्वरूपात डी.एड., बी.एड. अर्हताधारक बेरोजगार पात्र व इच्छुक उमेदवारांना पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेचे प्रमाणपत्र व स्थानिक गावातील रहिवासी असल्याबाबतचे पुरावा दाखल दस्ताऐवजासह अर्ज सादर करण्याचे आव्हान जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार यांनी केले आहे. 

२५० शाळांमध्ये येणार कंत्राटी शिक्षक जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात एकूण १४६४ शाळा आहेत. दरम्यान १० आणि १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या जवळपास २४६ इतकी आहे. या शाळा पेसा क्षेत्रातील व अवघड तसेच दुर्गम भागातील आहे.

येथे होणार शिक्षकांची नियुक्ती कमी पटसंख्येच्या शाळा आदिवासीबहुल भागात आहेत. यामध्ये अहेरी उपविभागातील पाच तालुके आणि उत्तर भागातील कोरची तालुक्यात कमी पटसंख्येच्या शाळा आहेत. अहेरी, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, सिरोंचा तसेच कोरची तालुक्यातील १० आणि १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

गुणवत्तेचे काय ?दुर्गम, अतिदुर्गम भागात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. कमी पटसंख्येच्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक नेमत असताना गुणवत्तेकडे लक्ष कोण देणार, असा प्रश्न शिक्षणप्रेमी नागरिकांतून उपस्थित होत आहे. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गुणवत्तेचे धोरण निश्चित करावे, अशी मागणी होत आहे.

"शासनाच्या निर्णयानुसार डी. एड., बी.एड. अर्हताधारक उमेदवारास तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षक पदावर नियुक्त्ती देण्यात येणार आहे. स्थानिक उमेदवारांना यात संधी असून डी. एड., बी.एड. अर्हताधारक बेरोजगारांनी १० ऑक्टोबरपर्यंत गटशिक्षणाधिकारी पंचायत समितीकडे अर्ज सादर करावे." - बाबासाहेब पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

टॅग्स :SchoolशाळाGadchiroliगडचिरोली