शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
6
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
7
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
8
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
9
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
10
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
11
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
12
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
13
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
14
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
15
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
16
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
17
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
18
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
19
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
20
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?

३०० थकबाकीदारांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 1:19 AM

गडचिरोली नगर परिषदेने अर्थिक वर्ष संपण्याची चाहुल लागताच कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे मागील दोन ते तीन वर्षांपासून कर थकित आहे अशा ३०० थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.

ठळक मुद्देकरवसुली मोहीम वेगात : ९० टक्क्यांवर नेण्याचा गडचिरोली नगर परिषदेचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेने अर्थिक वर्ष संपण्याची चाहुल लागताच कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे मागील दोन ते तीन वर्षांपासून कर थकित आहे अशा ३०० थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत एकूण ५७.३३ टक्के कर वसुली झाली असून ९० टक्क्यांच्यावर कर वसुली करण्याचा निर्धार नगर परिषद प्रशासनाने केला आहे.९० टक्क्यांपेक्षा अधिक करवसुली करावी, असे सक्त निर्देशच नगर विकास विभागाने नगर परिषदांना दिले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त कर वसुली करण्याच्या दृष्टीने नगर पालिका प्रयत्न करीत आहे. गडचिरोली शहरात एकूण ११ हजार ८०५ मालमत्ताधारक आहेत. त्यांच्याकडून एकूण २ कोटी ६४ लाख ८६ हजार ६७० रूपयांची मागणी आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत एकूण १ कोटी ५३ लाख ८२ हजार रूपयांची वसुली झाली आहे. याची टक्केवारी ५८.०८ टक्के एवढी आहे. पाणीपट्टीची एकूण मागणी १ कोटी ८ लाख ८१ हजार ८८९ एवढी आहे. त्यापैकी ५४ लाख ३१ हजार ८८९ रूपयांची वसुली झाली आहे. ५४ लाख ५० हजार रूपये शिल्लक आहेत. पाणीपट्टीची वसुली एकूण मागणीच्या ४९.९२ टक्के एवढी झाली आहे.सद्यस्थितीत कर वसुलीसाठी एकच पथक नेमण्यात आले आहे. मात्र पुढील आठवड्यात पथकांची संख्या वाढविली जाणार आहे. सध्या केवळ कर विभागाचेच कर्मचारी कर वसुलीचे काम करीत आहेत. इतरही कर्मचाऱ्यांना पथकामध्ये समाविष्ट करून घेतले जाणार आहे. मागील वर्षी मार्चअखेर ८० टक्के करवसुली झाली होती.थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे धास्तावलेल्या थकबाकीदारांनी स्वत:हून नगर परिषदेमध्ये येऊन पैसे भरले होते. हीच कार्यपद्धती नगर परिषद यावर्षी अवलंबणार आहे. कर विभाग प्रमुख रवींद्र भंडारवार व कर विभाग सहायक सुनील पुण्यप्रेडिवार यांच्यासह इतर अधिकारी कर वसुलीवर विशेष लक्ष देऊन आहेत.५ मार्चपासून जप्तीची कारवाईमालमत्ता धारकांकडे ८४ लाख ५२ हजार ३४४ रूपये, पाणीपट्टीकर २९ लाख ५५ हजार १२३ रूपये, शिक्षण उपकर १२ लाख ५६ हजार ४१५ रूपये, रोहयो उपकर १ लाख २४ हजार ३०३, वृक्षकर १ लाख २४ हजार २३४, गाळेभाडे ४ लाख ९४ हजार ३६८ रूपये थकले आहेत. काही नागरिकांकडे दोन ते तीन वर्षांपासून कर वसुली थकीत आहे. अशा नागरिकांकडून कर वसुली करण्यावर नगर पालिका विशेष भर देत आहे. ३०० मालमत्ताधारकांना नोटीस बजावून कर भरण्याचे आवाहन केले आहे. मात्र काही मालमत्ताधारक जाणूनबूजन कराचा भरणा करीत नाही. अशा करधारकांकडून वसुली करण्यासाठी नगर पालिकेने एक पथक नेमले आहे. हे पथक थकबाकीधारांकडून कराची वसुली करीत आहे.५ मार्चपासून कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली जाणार आहे. मालमत्ता कर न भरणाऱ्यांची मालमत्ता जप्त केली जाईल. जप्त केलेली मालमत्ता सोडविण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली जाईल. या मुदतीत मालमत्ता न सोडविल्यास तिचा लिलाव केला जाईल. प्रत्येक नागरिकाने मालमत्ता व इतर कर भरून कारवाई टाळावी. तसेच नगर परिषदेला सहकार्य करावे.- रवींद्र भंडारवार, कर विभाग प्रमुख, नगर परिषद गडचिरोली

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका