शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माओवाद्यांच्या बंदला 'नो रिस्पॉन्स', पोलिस दिवसभर 'अलर्ट मोड'वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:22 IST

Gadchiroli : सीमावर्ती भागात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे वॉच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) सरचिटणीस व माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव ऊर्फ बसवा राजू (७०) याच्या स्मरणार्थ १० जून रोजी माओवाद्यांनी पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. नक्षलप्रभावित भागात पोलिस अलर्ट मोडवर होते, पण नागरिकांनी हा बंद झुगारून लावत आपले व्यवहार सुरळीत ठेवले.

२१ मे रोजी छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत २७ माओवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले होते. यात माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव ऊर्फ बसवा राजू याचाही समोवश होता. माओवाद्यांचा केंद्रीय समिती सदस्य भूपती ऊर्फ अभय याने २८ मे रोजी पत्रक जारी करून सरकार व पोलिसांबद्दल आगपाखड केली होती. १० जून रोजी भारत बंदची हाक दिली होती. यासोबतच ११ जून ते ३ ऑगस्टदरम्यान बसवा राजू आणि इतर मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मृतीत 'स्मारक सभा' आयोजित करण्याचे आवाहनही केले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर होती.

सीमावर्ती भागात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे वॉचदरम्यान, भारत बंदच्या पार्श्वभूमीवर गस्त घालताना छत्तीसगडच्या बस्तरमध्ये माओवाद्यांनी ९ जून रोजी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक आकाश राव गिरेपुंजे (४६) हे शहीद झाले होते. या पार्श्वभूमीवर तेलंगणा, छत्तीसगड या सीमावर्ती भागात हायअलर्ट जारी करण्यात आला होता. गडचिरोली पोलिसांनी माओवादविरोधी अभियान गतिमान केले होते. ठिकठिकाणी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करून माओवाद्यांच्या हालचाली टिपल्या जात होत्या. मात्र, सुदैवाने कोठेही अप्रिय घटना घडली नाही.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली