शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पाय ठेवायला जागा नाही; वाहन कोठे ठेवणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 14:13 IST

Gadchiroli : गणेश मंडपाजवळ गर्दी, वाहन चोरीचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळत आहे. प्रत्येक भाविकाचे कुटुंब दुचाकी किंवा चारचाकीवर येते. वाहने ठेवण्यासाठी गणेश मंडळांकडे पार्किंगची व्यवस्था नाही. परिणामी, वाहने भर रस्त्यावरच उभी केली जातात. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच वाहन चोरीला जाण्याची शक्यता असते.

सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत विविध प्रकारचे देखावे, आकर्षक रोषणाई केली जाते. ही रोषणाई व देखावे बघण्यासाठी शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिक येतात. 

इंदिरा गांधी चौकी : इंदिरा गांधी चौकात असलेल्या विश्रामगृहात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मार्गावरच वाहने उभी केली जातात.

रेड्डी गोडावून चौक : शहरातील रेड्डी गोडावून चौकातही सार्वजनिक उत्सव मंडळामार्फत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सदर ठिकाण शहराच्या आतील भागात आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी केली जातात.

आरमोरी मार्ग : गडचिरोली शहरातील आरमोरी मार्गावर गणेश मंडपात शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखावा तयार करण्यात आला आहे. सदर देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळते. या ठिकाणी येणारे भाविक थेट रस्त्यावरच वाहने ठेवतात. या मार्गावरून वाहनांची वर्दळ असते, हे विशेष

घरगुती गणपतीचे विसर्जन जोरात घरगुती गणपतीच्या विसर्जन जोरात केले जात आहे. संदल, बँडपार्टी, डीजेच्या तालावर वाजत-गाजत मिरवणूक काढली जात आहे. या मिरवणुकीत शेकडो जण सहभागी होत असल्याने वाहतुकीची कोंडी होत असते. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली