शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
2
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
3
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
4
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
5
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
6
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
7
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
8
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
9
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
10
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
11
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
12
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
13
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
14
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
15
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
16
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
17
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
18
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
19
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

एकही धान खरेदी केंद्र सुरू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 06:00 IST

या तालुक्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने रोवणीचे काम लांबणीवर पडले. परिणामी धानाची कापणी व बांधणीचे कामही पुढे सरकले. आता धानोरा तालुक्यात हलके, मध्यम व जड या तीनही प्रतीच्या धानाची लागवड केली जाते. हलक्या प्रतीच्या धानाची कापणी झाली असून अनेक शेतकरी धान विकण्याच्या तयारीत आहेत.

ठळक मुद्देधानोरा तालुक्यात अडचण वाढली : महामंडळ व आविका संस्थेत समन्वयाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत आविका संस्थेच्या वतीने दरवर्षी धानाची खरेदी केली जाते. यावर्षीही धानोरा तालुक्यात ८ केंद्रांना मंजुरी देण्यात आली. मात्र एकही केंद्र अद्याप सुरू न झाल्याने या भागातील शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.या तालुक्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने रोवणीचे काम लांबणीवर पडले. परिणामी धानाची कापणी व बांधणीचे कामही पुढे सरकले. आता धानोरा तालुक्यात हलके, मध्यम व जड या तीनही प्रतीच्या धानाची लागवड केली जाते. हलक्या प्रतीच्या धानाची कापणी झाली असून अनेक शेतकरी धान विकण्याच्या तयारीत आहेत. आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर खरेदीचा शुभारंभ झाला नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्याला धान विकावे लागत आहेत.शासनाने व प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन मंजूर केलेले तालुक्यातील धान खरेदी केंद्र लवकर सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. धानोरा तालुक्यात सोडे, रांगी, मोहली, धानोरा, दुधमाळा, मुरूमगाव, कारवाफा व पेंढरी अशा ८ केंद्रांना मंजुरी देण्यात आली. मात्र संस्थेच्या वतीने हे केंद्र सुरू करण्यात आले नाही. सन २०१९-२० या वर्षातील खरीप हंगामात जिल्हा प्रशासन व महामंडळाच्या वतीने या आठ केंद्रांना आठ दिवसांपूर्वीच मंजुरी प्रदान करण्यात आली. मात्र आविका संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ताठर भूमिका घेतली.मागण्या पूर्ण झाल्याशिवाय धान खरेदी करणार नाही, असा इशारा संस्थांनी महामंडळाला दिला होता. त्यानंतर महामंडळ व शासनाच्या वतीने गतीने कार्यवाही करून संस्थांच्या काही मागण्या निकाली काढल्या आहेत.आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने संस्थेच्या सहकार्याविना केंद्र सुरू होण्यास विलंब झाला. महामंडळ कार्यालयाने थकीत कमिशन व प्रतवारीकरांचे पैसे संस्थेच्या खात्यात वर्ग केले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत तालुक्यातील केंद्र सरू होतील. आतापर्यंत पर्यंत पाच केंद्रांवर बारदाना पोहोचविण्यात आला असून उर्वरित केंद्रावर गुरूवारला बारदाना पोहोचविण्यात येणार आहे.- डी.एस.चौधरी, उपप्रादेशिक व्यवस्थापक,आदिवासी विकास महामंडळ कार्यालय, धानोरादोन दिवसात येणार गतीगतवर्षीच्या हंगामातील खरेदी कामाच्या कमिशनची रक्कम संबंधित आविका संस्थेच्या खात्यात वळती करण्यात आली तसेच यावर्षी बारदानाही पुरविण्यात आला. शासन स्तरावरील मागण्या वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आल्या असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे. आविका संस्थेकडून आता सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने येत्या दोन ते तीन दिवसांत खरेदी केंद्रांवर धान खरेदीला सुरूवात होणार आहे.

टॅग्स :Marketबाजार