शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

पीक कर्जासाठी बेबाकी प्रमाणपत्राची गरज नाही

By admin | Updated: September 17, 2016 01:51 IST

पीक कर्ज वितरणासाठी रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशांचे बँकेने पालन करावे, कर्ज वितरणासाठी कोणत्याही बेबाकी प्रमाणपत्राची गरज नाही.

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वितरित करावेगडचिरोली : पीक कर्ज वितरणासाठी रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशांचे बँकेने पालन करावे, कर्ज वितरणासाठी कोणत्याही बेबाकी प्रमाणपत्राची गरज नाही. याची जाणीव ठेवून कर्ज वितरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिले. गुरूवारी स्थानिक बँक आॅफ इंडिया शाखेस जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. त्याप्रसंगी बँक अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पीक कर्ज वाटप तसेच पुनर्गठण यासह विविध केंद्रीय वैैयक्तिक लाभाच्या योजनांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला. बैठकीला अग्रणी बँक अधिकारी एस. आर. खांडेकर, उपविभागीय अधिकारी तळपादे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, शाखा व्यवस्थापक कैलास मडावी, सहाय्यक व्यवस्थापक श्वेता पाटील हजर होते.प्रत्येक बँक शाखेने आपला वार्षिक वित्त आराखडा सादर करावा. त्यात प्राधान्याने पीक कर्ज पुरवठा आणि इतर बाबींचा समावेश करावा, असे नायक म्हणाले. सर्व बँकाना शैक्षणिक कर्जासाठीही उद्दिष्ट देण्यात आलेले आहे, याचीही पुर्तता करणे गरजेचे आहे. दरम्यान जिल्हाधिकारी नायक यांनी पत्रकारांशी स्थानिक समस्याबाबत चर्चा करुन समस्या जाणून घेतल्या. (शहर प्रतिनिधी)महिला बचत गटांची मदत घ्याकेंद्र शासनाच्या थेट वैयक्तिक लाभासाठी अशा लाभधारकांचे खाते उघडणे आणि ते आधार क्रमांकाशी संलग्न करणे यासाठी सर्वच बँकानी येणाऱ्या काळात मिशन मोड मध्ये काम करण्याची गरज आहे. असे सांगून ते म्हणाले की, बँकानी आपल्या सेवा क्षेत्रात घरनिहाय बँक खाते उघडले की नाही याची खातरजमा करुन घ्यावी यासाठी महिला बचत गटांची मदत घेणे आवश्यक आहे. २५ पर्यंत शेवटची मुदतखरिपासाठी कर्ज वाटपाची मुदत २५ सप्टेंबरपर्यंत आहे. सध्या चामोर्शी शाखेने १ कोटी ३८ लाख रुपये पीक कर्ज दिलेले आहे. तुलनेत ५० टक्के इतके पीक कर्ज वाटप शाखेने केलेले आहे. उर्वरित काळात कोणत्याही अटी शर्ती न घालता बँकेने उद्दिष्ट पुर्तीसाठी प्रयत्न करावे, असेही नायक म्हणाले.