शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात तीन वर्षांत नऊ वाघ-बिबट्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2022 14:06 IST

२०१९ ते फेब्रुवारी २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण नऊ वाघ व बिबट्यांचा मृत्यू झाला. मात्र, यात शिकारीपेक्षा वाघ व बिबट्यांच्या मृत्यूस नैसर्गिक कारणच जबाबदार असल्याचे वनविभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देएकाची शिकार, तर एकाचा करंट लागून बळी

गाेपाल लाजुरकर

गडचिराेली : राज्यात सर्वाधिक जंगल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ९० च्या दशकानंतर २०१७-१८ मध्ये पुन्हा वाघांचा संचार वाढला. त्यापाठोपाठ मानव-वन्यजीव संघर्षही वाढण्यास सुरुवात झाली. अशातच पुन्हा वाघबिबट्यांच्या शिकारीही वाढल्या. २०१९ ते फेब्रुवारी २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण नऊ वाघ व बिबट्यांचामृत्यू झाला. मात्र, यात शिकारीपेक्षा वाघ व बिबट्यांच्या मृत्यूस नैसर्गिक कारणच जबाबदार असल्याचे वनविभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

या जिल्ह्यात ९० च्या दशकानंतर पहिल्यांदाच ६ जून २०१९ राेजी वडसा वनविभागातील काेंढाळा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे नर पिलू ठार झाले. त्यानंतर २९ जुलैला एकलपूर शेतशिवारात नर बिबट्याचा करंट लागून मृत्यू झाला. त्यापाठोपाठ पाेर्ला वनक्षेत्रातील चुरचुरा येथे नर बिबट्या मृतावस्थेत आढळला. गडचिराेली वन विभागातील अमिर्झा येथे १८ जानेवारी २०२० रोजी, तर खुर्सा जंगलात २३ जून २०२० राेजी वाघ मृतावस्थेत आढळले. याशिवाय वडसा वनविभागातील चाेप येथे नर बिबट, आलापल्ली वन विभागातील माेसम येथे मादी वाघ, नेंडेर येथे नर वाघ, वडसा वन विभागातील पाेर्ला येथे नर वाघ मृतावस्थेत आढळला. आतापर्यंत पाच वाघ आणि चार बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिक, दाेन बिबट्यांचा अपघाती, तर एका बिबट्याचा विद्युत करंटने मृत्यू झाला. एका वाघाची शिकार विद्युत प्रवाह साेडून करण्यात आली.

झुंजीमुळे दाेघांचा बळी

गडचिराेली जिल्ह्यात वाघांची संख्या गेल्या तीन वर्षांत झपाट्याने वाढली. ती नेमकी किती हा आकडा वन विभागाकडे उपलब्ध नाही; परंतु वाढलेल्या संख्येमुळे दाेन नर वाघांमध्ये आपल्या हद्दीवरून झुंजी झाल्या आहेत. यामध्ये चातगाव वनपरिक्षेत्रातील खुर्सा येथे एका वाघाचा बळी, तर पाेर्ला वनक्षेत्रातील साखरा जंगल परिसरात दुसऱ्या एका वाघाचा मृत्यू झाला हाेता. अमिर्झा नजीकच्या माैशीचक येथे एका वाघाचा भूकबळी गेला आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणDeathमृत्यूTigerवाघleopardबिबट्या