शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कूल बसला ट्रकची धडक, नऊ विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 18:23 IST

चंद्रपूर मार्गावरील नवेगाव येथे ट्रकने शाळेचे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या व्हॅनला धडक दिली. या अपघातात ९ विद्यार्थी जखमी झाले.

ठळक मुद्देनवेगावजवळ अपघात

गडचिराेली : पंक्चर दुरूस्त करण्यासाठी रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या स्कूल बसला ट्रकने धडक दिल्याने बस उलटून नऊ विद्यार्थी जखमी झाले. हा अपघात गडचिराेलीजवळ चंद्रपूर मार्गावरील नवेगाव येथे गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास घडला.

माहितीनुसार, डाेंगरगाव येथील सेंट जाेसेफ नॅशनल स्कूलची बस विद्यार्थ्यांना घेऊन नवेगावकडे जात हाेती. दरम्यान टायर पंक्चर झाल्याने नवेगावजवळ बस उभी करून पंक्चर दुरूस्त केला जात हाेता. यावेळी विद्यार्थी स्कूल बसमध्येच बसले हाेते. दरम्यान छत्तीसगडवरून मूलकडे जात असलेल्या ट्रकने स्कूल बसला मागून धडक दिली.

ही धडक जाेरात बसल्याने स्कूल बस रस्त्याच्या मधाेमध असलेल्या दुभाजकावर जावून उलटली. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या सायकलस्वारालाही बसने धडक दिल्याने तो ही जखमी झाला. तसेच बसमधील नऊ विद्यार्थी जखमी झाले. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. धडक देणारा ट्रक रस्त्यालगत असलेल्या दुकानाच्या दिशेने गेला. पण तिथे असलेल्या विद्युत खांबामुळे ताे अडला.

जखमी विद्यार्थ्यांमध्ये शाैर्य खाेब्रागडे (१२), स्पंदन काेंडावार (१२), प्रतिक समजदार (१५), सुनील भांडेकर (१२), श्रेयस काेंडावार (८), अनुष्का शर्मा (१२), आदिती शर्मा (१३), श्रेया रायपुरे (१३), अव्हिरा कांबळे (४) आदींचा समावेश आहे. गडचिराेली पाेलिसांनी ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून स्कूल बसही जप्त केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थीGadchiroliगडचिरोली