कामाचे आदेश दिले : शहीद कुटुंबीयांच्या सहकारी संस्थेचे उद्घाटनगडचिरोली : शहीद कुटुंबियांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र व गडचिरोली पोलीस विभाग कटिबध्द आहे. याचाच एक भाग म्हणून शहीद कुटुंबीयांसाठी जानकी शहीद पोलीस विविध वस्तू व सेवा सहकारी संस्था उभारण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून शहीद कुटुंबीयांचे प्रगतीचे हे नवे पाऊल आहे, असे प्रतिपापदन राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले. पोलीस विभागाच्या सहकाऱ्याने पोलीस मुख्यालयाच्या परिसरात नव्यानेच उभारण्यात आलेल्या जानकी शहीद पोलीस परिवार विविध वस्तू व सेवा सहकारी संस्थेच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मंचावर विशेष पोलीस महानिरिक्षक रवींद्र कदम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, राहूल श्रीरामे, एम. राजकुमार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना रश्मी शुक्ला म्हणाले, नव्यानेच उभारण्यात आलेल्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून शहीद कुटुंबातील वीर माता व वीर पत्नी यांना व्यवसाय उभारता येणार आहे. त्यामुळे या महिलांचा आर्थिक विकास होण्यासाठी मदत होणार आहे, असेही ते यावेळी म्हणाल्या. विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम म्हणाले, तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेज हक यांची शहीद कुटुंबीयांसाठी सहकारी संस्था उभारण्याची संकल्पना होती. त्यांची संकल्पनेला आज मूर्त स्वरूप मिळाले. या संस्थेच्या भरभराटीसाठी पोलीस विभाग सदैव पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी लावलेले हे छोटेशे रोपटे आहे. या रोपट्याचे येत्या काही वर्षात मोठे वटवृक्ष होईल, असेही ते म्हणाले. संचालन सचिन पवार, प्रास्ताविक कोल्हे यांनी केले तर आभार पोलीस उपअधीक्षक (गृह) डी. बी. इलमवार यांनी मानले. यावेळी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
प्रगतीचे नवे पाऊल
By admin | Updated: August 30, 2014 23:43 IST