शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वाढीव महिला रुग्णालयासाठी महसूलच्या जागेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:00 IST

सध्या १०० खाटांच्या रुग्णालयात २५० पेक्षा अधिक गरोदर माता, प्रसूत झालेल्या माता, नवजात बालके व इतर गंभीर आजार असलेली बालके भरती आहेत. त्यामुळे इतर कामासाठी असलेल्या खोल्यांमध्ये खाटा ठेवून गरोदर माता व बालकांना भरती करण्यात आले आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवर सुद्धा कामाचा ताण वाढला आहे.

ठळक मुद्दे३० कोटींचा निधी उपलब्ध : बाजूलाच होणार पुन्हा प्रशस्त इमारत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली येथे सध्या १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय आहे. शासनाने पुन्हा १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय मंजूर केले आहे. त्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी सुद्धा उपलब्ध झाला आहे. सदर इमारत बांधण्यासाठी महिला रुग्णालयाजवळ सध्या उपलब्ध असलेल्या जागेबरोबरच महसूल विभागाच्याही जागेची आवश्यकता आहे.गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय मागील दोन वर्षांपासून सुरू झाले आहे. या रुग्णालयात संपूर्ण जिल्ह्यातील तसेच नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातीलही गरोदर माता व लहान बालके भरती होतात. परिणामी या रुग्णालयात नेहमीच गर्दी राहते. सध्या १०० खाटांच्या रुग्णालयात २५० पेक्षा अधिक गरोदर माता, प्रसूत झालेल्या माता, नवजात बालके व इतर गंभीर आजार असलेली बालके भरती आहेत. त्यामुळे इतर कामासाठी असलेल्या खोल्यांमध्ये खाटा ठेवून गरोदर माता व बालकांना भरती करण्यात आले आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवर सुद्धा कामाचा ताण वाढला आहे.ही सर्व परिस्थिती लक्षात घेता पुन्हा १०० खाटांचे रुग्णालय व्हावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार शासनाने १०० खाटांच्या रुग्णालयाला मंजुरी दिली आहे. एनआरएचएम अंतर्गत ३० कोटी रुपयांचा निधी सुद्धा इमारत बांधकामासाठी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून सध्या अस्तित्वात असलेल्या महिला व बाल रुग्णालयाजवळच नवीन इमारत बांधावी लागणार आहे. तेव्हाच एकत्र दवाखाना दिसेल. तसेच कर्मचारी, डॉक्टर यांच्यासाठीही सोयीचे होईल.महिला व बाल रुग्णालयाच्या मागील बाजूस तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व न्यायाधीश यांची निवासस्थाने आहेत. ही निवासस्थाने अगदी वर्दळीच्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर इमारती सुद्धा जुन्या आहेत. त्यामुळे काही अधिकारी या निवासस्थानांमध्ये राहत नाही. जिल्हा परिषदेने स्वत:ची जागा रुग्णालयाला देण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे. मात्र प्रशस्त इमारत बांधण्यासाठी निवासस्थाने असलेली जागा मिळणे आवश्यक आहे. सदर जागा महसूल विभागाची असल्याने जिल्हाधिकारी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे.एप्रिलमध्ये मिळाला ३० कोटींचा निधी१०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय बांधण्यासाठी एप्रिल २०१९ मध्येच एनआरएचएमअंतर्गत सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मात्र इमारतीची जागा निश्चित झाली नसल्याने सदर निधी चार महिन्यांपासून पडून आहे. महसूल विभागाने जागा उपलब्ध करून दिल्यास प्रशस्त इमारत बांधणे शक्य होणार आहे. रुग्णकल्याण समितीच्या नियामक मंडळाची सभा पार पडली. या सभेत महसूल विभागाची जागा मागणीसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागाची जागा मिळाल्यास या ठिकाणी प्रशस्त इमारत बांधण्याचा मार्ग मोकळा होईल.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल