लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्य आहेत. या कौशल्यांना वाव देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. त्याच अनुषंगाने पोलीस विभागाकडून ‘प्रयास व प्रगती’ या योजना आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू केल्या आहेत. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, असे प्रतिपादन गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहीत गर्ग यांनी केले.अहेरी प्रकल्पांतर्गत येत असलेल्या आश्रमशाळांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन खमनचेरू येथील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळेत २ ते ४ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. याचे उद्घाटन गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय बन्सल, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, जि.प. सदस्य सुनिता कुसनाके, खमनचेरूच्या सरपंच मंजुळा आत्राम, उपसरपंच रमेश मडावी, शाळा समिती अध्यक्ष मनीला मडावी, संतोष देवारे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना अहेरीच्या प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड म्हणाल्या, खेळ हा विद्यार्थी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक स्पर्धकाने क्रीडा स्पर्धेचे महत्त्व जाणून खेळांमध्ये सहभाग घ्यावा, असे मार्गदर्शन केले. यावेळी अभिनेता चिरंजीव गड्डमवार यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक सहायक प्रकल्प अधिकारी पी. पी. सादमवार, संचालन अनिल पोटे तर आभार मुख्याध्यापक एस. ए. नन्नेवार यांनी मानले.यशस्वीतेसाठी सहायक प्रकल्प अधिकारी आर. एस. बोनगिरवार, जी. पी. चौधरी, पी. जी. जामठे, आदिवासी विकास सहयोगी सतिश पडघन यांच्यासह अहेरी प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.६०९ विद्यार्थ्यांचा सहभागया क्रीडा स्पर्धेत अहेरी प्रकल्पातील सुमारे ६०९ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. ज्यात ३३० मुले व २७९ मुलींचा सहभाग आहे. खमनचेरू केंद्रातील ७४ मुले, ८४ मुली, बामणी येथील ७९ मुले, ५८ मुली, जिमलगट्टा केंद्रातील ८२ मुले व ७० मुली, मुलचेरा केंद्रातील ९५ मुले व ६७ मुलींनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेच्या पूर्वी सर्वच स्पर्धकांना शपथ देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाव देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:21 IST
आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्य आहेत. या कौशल्यांना वाव देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. त्याच अनुषंगाने पोलीस विभागाकडून ‘प्रयास व प्रगती’ या योजना आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू केल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाव देण्याची गरज
ठळक मुद्देमोहित गर्ग यांचे प्रतिपादन : अहेरी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचा रविवारी शुभारंभ