शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

शरीरासोबत मन टवटवीत ठेवण्यासाठी कलेची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 19:56 IST

तुम्ही शरीर चांगले आणि तरुण ठेवण्यासाठी अनेक गोष्टी करता, पण त्यासोबत मनाने तरुण, टवटवीत असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

गडचिरोली : तुम्ही शरीर चांगले आणि तरुण ठेवण्यासाठी अनेक गोष्टी करता, पण त्यासोबत मनाने तरुण, टवटवीत असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हे करण्यासाठी आपल्या अंगातील कलेची उपासना करून त्याचा उपयोग करा, असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांनी तरुणांना उद्देशून केले.येथील गोंडवाना विद्यापीठात १७व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक कला महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०१९’चे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर तर अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी, राजभवन निरीक्षण समितीचे डॉ. सुनील पाटील, वित्त प्रबंधन समितीचे अध्यक्ष डॉ. एम. बी. पाटील, विद्यापीठाचे कूलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.राज्यभरातून आलेल्या २० विद्यापीठांच्या संघातील महाविद्यालयीन कलावंत युवक-युवती, प्राध्यापक आणि परीक्षकांच्या उपस्थितीत सोमवारी गोंडवाना महाविद्यालयाच्या प्रांगणात दीप प्रज्वलनाने या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी डॉ. काणे म्हणाले, आयुष्यात उपयोगाच्या सर्वच गोष्टी अभ्यासक्रमात शिकवल्या जात नाही. त्यामुळेच कुलपतींच्या (राज्यपाल) कार्यालयाच्या परवानगीने शरीर, मन आणि बुद्धी यांच्या विकासासाठी अश्वमेध, इंद्रधनुष्य आणि अविष्कार हे अनुक्रमे क्रीडा, कला आणि विज्ञानाला चालना देणारे राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ महोत्सव दरवर्षी आयोजित केले जात आहेत. या महोत्सवातून आपल्याला नवीन उर्जा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या महोत्सवादरम्यान पाच प्रकारच्या कलाप्रकारातील २६ स्पर्धांमध्ये राज्यभरातून आलेले विद्यार्थी कलावंत कलेचे सादरीकरण करणार आहेत. ६ ला या महोत्सवाचा समारोप आणि बक्षीस वितरण होईल.