शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्ती आहे का...?; ज्या जातीचे लोक मराठ्यांना त्रास देतील...! मनोज जरांगेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंना इशारा
2
Narendra Modi 3.0 : गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र...; भाजप आपल्याकडेच ठेवणार 'CCS' मधील ही महत्वाची मंत्रालयं!
3
मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार, महाराष्ट्रातील 'या' ६ खासदारांच्या नावांची चर्चा
4
जंक फूड, प्रोसेस्ड फूड खायला आवडतं? आताच थांबा; कॅन्सरसह 'या' आजारांचा मोठा धोका
5
Jayant Patil : "समुद्र नाही याची पुणेकरांना खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला"
6
VIDEO: मुंबई विमानतळावर वाचला शेकडो प्रवाशांचा जीव! थोडक्यात टळली दोन विमानांची धडक
7
"हँडसम आफ्रिदी...", नवज्योतसिंग सिद्धू आणि माजी पाकिस्तानी खेळाडूचा संवाद Viral
8
मोदी सरकारमध्ये उत्तर प्रदेशमधून कुणाकुणाला संधी? ही नावं येताहेत समोर   
9
मस्तच! रोज एक चमचा तूप खाण्याचे असंख्य फायदे; रोगप्रतिकारक शक्ती होईल मजबूत अन्...
10
सावधान! Android युजर्ससाठी धोक्याची घंटा; तुमचा फोन होऊ शकतो हॅक, सरकारचा इशारा
11
भीषण परिस्थिती! कोरडा दुष्काळ, वाटीभर पाण्यासाठी रांगा; अंगावर काटा आणणारे दृश्य
12
नाशिकचे स्वच्छतादूत चंद्रकांत पाटील यांना मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण
13
प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी, सायंकाळी मोदी सरकारमध्ये घेणार शपथ
14
Sara Tendulkar Net Worth : सचिनची 'लेक' कोट्यवधीची मालकीण; जाणून घ्या 'सारा' कमाईचा स्त्रोत
15
मोदींच्या नेतृत्वाखालील नव्या NDA सरकारमध्ये काय असेल अमित शाह यांची भूमिका?
16
VIDEO: १६ फूटांच्या अजगराने महिलेला जिवंत गिळले; तीन दिवसांनी पोटातून...
17
Mamata Banerjee : नरेंद्र मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार का?; ममता बॅनर्जींनी स्पष्ट केली भूमिका
18
Modi 3.0 : 'टीम मोदी'मध्ये कोण-कोण? मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी कुणा-कुणाला आला फोन? येथे पाहा 'लेटेस्ट लिस्ट'!
19
IND vs PAK : पाकिस्तानने चूक दुरुस्त केली; भारताविरूद्धच्या सामन्यासाठी संघात मोठा बदल केला
20
Adhir Ranjan Chowdhury : "जास्त दिवस टिकणार नाही मोदी सरकार, राहुल गांधींना..."; अधीर रंजन यांची भविष्यवाणी

सामान्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादीचा एटापल्लीत हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:35 PM

एटापल्ली तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी, शेतमजूरांचा मोर्चा शुक्रवारी तहसील कार्यालयावर धडकला.

ठळक मुद्देशेकडो नागरिकांची उपस्थिती : उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मागण्यांचे निवेदन शासनाला पाठविले

आॅनलाईन लोकमतएटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी, शेतमजूरांचा मोर्चा शुक्रवारी तहसील कार्यालयावर धडकला. राजीव गांधी हायस्कूल ते उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चादरम्यान एटापल्ली येथील वाहतूक काही काळ प्रभावित झाली.सुरजागड पहाडीवरील खदानींच्या लिजचा निर्णय ग्रामसभेला विश्वासात घेऊन घ्यावा, लोहखनिज प्रकल्पात स्थानिक युवकांनाच रोजगार द्यावा, ३१ मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम माफ करून त्यांचा सातबारा कोरा करावा, तालुक्यातील गावांमध्ये वीज, पाणी, आरोग्य व शिक्षण आदी सुविधा पुरवाव्या, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार द्यावा, जबरानजोतधारकांना पट्टे देण्यात यावे, अहेरी जिल्हा घोषित करावा आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एटापल्लीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात रायुकाँचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संग्रामसिंग कोते, जिल्हा परिषद बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, ऋतूराज हलगेकर, पं.स. सदस्य हर्षवर्धनराव आत्राम, लिलाधर भरडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रायुकाँ जिल्हाध्यक्ष रिंकू पापडकर, राकाँ तालुका अध्यक्ष दौलत दहागावकर, पं.स. सभापती बेबीताई लेकामी, राजू नरोटे, संभाजी हिचामी, नगरसेविका सगुणा हिचामी, जिल्हा परिषद सदस्य ग्यानकुमारी कौशीक, ऋषी पोरतेट, पापा पुण्यमूर्तीवार, रामजी कत्रीवार, लक्ष्मण नरोटी, पंकज पुंगाटी, कैलाश कोरेत, लक्ष्मण नरोटी, शंकर करमरकर, मारोती दगाहावकर, केशव कंगाली, हरिदास टेकाम, दीपक यावले, प्रशांत कोपुलवार यांच्यासह तालुक्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते.एसडीएम कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर माजी राज्यमंत्री धर्मराव आत्राम यांच्या नेतृत्वात राकाँच्या शिष्टमंडळाने प्रभारी उपविभागीय अधिकारी ए.एस. थेटे यांना मागण्यांचे निवेदन देऊन समस्यांबाबत चर्चा केली. पेसा कायदा धाब्यावर बसवून सुरजागड येथून लोहखनिजाची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी व वाहतूक तसेच खणन बंद करण्याची मागणी केली. यावेळी नायब तहसीलदार एस. एन. सिलमवार, संवर्ग विकास अधिकारी अनिल वाघमारे, वन परिक्षेत्राधिकारी एस. एच. राठोड उपस्थित होते. शासनस्तरावरील मागण्या सोडविण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन एसडीओंनी दिले.स्वत:चा हक्कासाठी सरकार हाणून पाळाविद्यमान सरकार निव्वळ आश्वासन देण्याचे काम करत असून समोर काय करणार याची कल्पना त्यांनाच नाही. बेरोजगारी वाढली, युवक वर्ग रस्त्यावर उतरत आहेत. महिलांना सुरक्षा नाही, शेतकºयांच्या खात्यात रक्कम नाही मात्र, कर्जमाफी झाल्याची निव्वळ जाहिरातच दाखवितात. सध्या सरकार मध्ये विदर्भाचे नेते मोठमोठ्या पदावर असूनसुद्धा विदर्भाचा विकास नाही. चार वर्षे संपत आले, मात्र यांची आश्वासने अजूनही जशीच्या तशीच आहे. म्हणून या सरकारला आपली जागा दाखविण्याची वेळ आली आहे. सुरजागडसारख्या प्रकल्पाचा मुद्दा कायम असताना खणन सुरू करून कच्चा माल बाहेर घेऊन जात आहे. वास्तविक लोहप्रकल्प याच परिसरात होऊन स्थानिक युवकांना रोजगार मिळायला हवा. त्यासाठी संघर्ष करा, असे आवाहन राकाँचे युवक प्रदेश अध्यक्ष संग्रामसिंग कोते पाटील यांनी मोर्चेकरांना केले.