शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत नक्षलवाद्यांची पुन्हा जाळपोळ, नादुरुस्त ट्रकला लावली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 10:52 IST

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांची पुन्हा जाळपोळ केल्याची घटना समोर आली आहे. एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथे ही घटना घडली असून नक्षलवाद्यांनी एका नादुरुस्त ट्रकला आग लावली.

ठळक मुद्देगडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांची पुन्हा जाळपोळ केल्याची घटना समोर आली आहे.एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथे ही घटना घडली असून नक्षलवाद्यांनी एका नादुरुस्त ट्रकला आग लावली. मागच्या तीन दिवसातील ही दुसरी जाळपोळीची घटना आहे.

गडचिरोली - गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा जाळपोळ केल्याची घटना समोर आली आहे. एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथे ही घटना घडली असून नक्षलवाद्यांनी एका नादुरुस्त ट्रकला आग लावली. मागच्या तीन दिवसातील ही दुसरी जाळपोळीची घटना आहे. याआधी नक्षलवाद्यांनी पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मी) सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत रस्ता बांधकामावर असलेली 16 वाहने जाळली होती. रस्ता बांधकामाला तसेच सुरजागड लोहखाणीला विरोध म्हणून हे कृत्य करून कोट्यवधी रुपयांची हाणी करण्यात आली होती. ही घटना शुक्रवारच्या रात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आलापल्लीपासून 11 किलोमीटरवर असलेल्या वट्टेगट्टा ते गट्टेपल्ली या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत खडीकरणाचे काम एका कंत्राटदार कंपनीकडून सुरू होते. शुक्रवारी हे खडीकरणाचे काम संपणार होते. दरम्यान दुपारच्या सुमारास काही महिला नक्षलींसह 8 ते 10 नक्षलवाद्यांनी तिथे येऊन सदर बांधकामावरील मजुरांकडून त्यांच्याकडे असलेले मोबाईल फोन हिसकावून घेतले. त्यानंतर त्या कामाववील 10 पोकलॅन, 5 ट्रॅक्टर जेसीबी आणि एक 407 मालवाहू वाहन अशी एकूण 16 वाहने रस्त्याच्या कामापासून 3 किलोमीटर लांब रेगडी मार्गावरील जंगलाजवळ नेली आणि त्या वाहनांसाठी टाक्यांमध्ये ठेवलेले डिझेल शिंपडून ती वाहने पेटवून दिली. 

शनिवारी सकाळपर्यंत या वाहनांमधील आग धुमसत होती. यातील काही वाहने राजस्थान पासिंगची होती तर काही महाराष्ट्राची होती. या वाहनांची एकूण किंमत 4 कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले. तत्पूर्वी या नक्षलवाद्यांनी गावात येऊन बैठक घेऊन सदर कामाला विरोध असल्याचे गावकऱ्यांना बजावले होते. शुक्रवारी सकाळी मजुरांची सुटका झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक 10 चे हे कृत्य असल्याचे कळते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळी अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, एटापल्लीचे एसडीपीओ किरणकुमार सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी हालेवारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल काळे हे अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीfireआग