शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी जाळले वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे निवासस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 21:45 IST

भामरागड वनविभागांतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सशस्त्र नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली.

ठळक मुद्देवनरक्षकांना मारहाण करून साहित्यही पळविले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एटापल्लीपासून ३६ किमी अंतरावरील गट्टा या भामरागड वनविभागांतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सशस्त्र नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली. यात दुचाकी, काही साहित्य व कागदपत्रे जळाली असून काही साहित्य, मोबाईल नक्षलवाद्यांनी पळवून नेले. यावेळी उपस्थित दोन वनरक्षकांनाही बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारच्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार, गट्टा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कार्यालयाजवळच असलेल्या त्यांच्या सरकारी निवासस्थानात गोविंद अमृत दोहतरे (४०) हे गट्टा क्षेत्राचे बीट गार्ड आणि राजू मारोती झोरे (४५) हे कुंजेमर्का क्षेत्राचे बीट गार्ड झोपले असताना रात्री १०.३० वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी दारावर थाप मारली. कोण आहे असे विचारले असता, ‘मी गट्टा येथील नागरिक आहे’ असा आवाज बाहेरून आल्याने त्यांनी दार उघडले असता नक्षल्यांनी त्यांच्यावर बंदुक ताणून बाहेर काढले आणि हात बांधून व डोळ्यांवरही पट्टी बांधली. त्यांच्याकडील मोबाईल घेऊन तुम्ही झारेवाडा रोडचे सर्व्हेक्षण करता काय, तुमचे रेंजर पाटील कधी येणार, तो पोलीस स्टेशनचे सर्व्हेक्षणाचे काम करत आहे न, आदिवासींचे तिरकमान जप्त करतो काय, असे म्हणत जबर मारहाण केली. त्यानंतर निवासस्थानासमोर असलेली दुचाकी आत टाकून निवासस्थान पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात निवासस्थानातील सर्व महत्त्वाचे दस्तावेज जळूक खाक झाले तसेच भिंतीही फुटून गेल्याचे वनरक्षकांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.वनरक्षकांचे हात आणि पट्टी सोडून नक्षलवादी जंगलात पसार झाले. नक्षल्यांनी जुन्या स्टोअर रुमचे कुलूप तोडून संयुक्त व्यवस्थापन समितीचे साहित्य, वाळवी यांचे मंडप डेकोरेशन व कॅटरिंगचे सामान व भांडी, गॅस सिलेंडर तसेच वनविभागाचे जीपीएस, मोबाईल, पेन ड्राईव्ह, नकाशे व इतर साहित्य नेल्याची तक्रार वनरक्षकांनी केली आहे.

निशाण्यावर अधिकारी, सापडले कर्मचारीसदर प्रतिनिधीने दुपारी ३:३० च्या सुमारास घटनास्थळी भेट दिली असता दोन्ही वनरक्षक पोलीस मदत केंद्रात होते. त्यांची कोणत्याही वनअधिकारी किंवा वन कर्मचाऱ्याने भेट घेतली नाही. त्यांच्यापैकी एका वनरक्षकाशी एटापल्ली तालुक्यातील वेगवेगळ्या रेंजमध्ये कार्यरत असताना दोन वेळा अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागले. त्यांनी बदलीसाठी मागणी केली होती परंतू वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. यावेळी आरएफओ पाटील हे नक्षल्यांच्या निशाण्यावर असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पण कनिष्ठ कर्मचारी नक्षल्यांच्या हाती लागले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी