शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांकडून गोळ्या झाडून युवकाची हत्या, पैशांचा घोळ केल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 17:59 IST

 नक्षल समर्थक म्हणून पोलिसांकडे नोंद असलेल्या युवकाची बुधवारी नक्षल्यांनीच भर बाजारात गोळ्या झाडून हत्या केली. ईरपा बिरा उसेंडी (३०) रा.अपनपल्ली असे मृतकाचे नाव आहे. ही घटना बुरगी येथे दुपारी २.३० वाजता घडली.

एटापल्ली (गडचिरोली) : नक्षल समर्थक म्हणून पोलिसांकडे नोंद असलेल्या युवकाची बुधवारी नक्षल्यांनीच भर बाजारात गोळ्या झाडून हत्या केली. ईरपा बिरा उसेंडी (३०) रा.अपनपल्ली असे मृतकाचे नाव आहे. ही घटना बुरगी येथे दुपारी २.३० वाजता घडली.

प्राप्त माहितीनुसार, ईरपा उसेंडी हा काही नातेवाईकांसह बुरगीच्या आठवडी बाजारालगत भरलेल्या कोंबड बाजारात गेला होता. सर्वजण बाजारात व्यस्त असताना टायर फुटल्यासारखा आवाज आला. जमलेल्या लोकांनी पाहीले असता  ईरपा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यामुळे एकच पळापळ सुरू झाली. दोन नक्षलवाद्यांनी ईरपाच्या डोक्यात एक गोळी तर दुसरी हवेत झाडली होती. 

विशेष म्हणजे बुरकी गावातील उपपोलीस स्टेशन घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर आहे. पण कोणीही पोलीस कर्मचारी बाहेर निघाले नाही. गडबड झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी ठाण्यातील धोक्याची घंटा वाजविली. पण तोपर्यंत दोन्ही नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पसार झाले होते. 

दलम कमांडरचा भाऊविशेष म्हणजे मृत ईरपा उसेंडी हा नक्षल्यांचा दलम कमांडर साईनाथचा चुलत भाऊ असून नोटबंदीच्या काळात नक्षल्यांचे पैसे लपविल्याच्या आरोपात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. डिसेंबर २०१६ मध्ये सुरजागड प्रकल्पावरील लोहखनिज उत्खननादरम्यान नक्षल्यांनी ७८ वाहने जाळली होती. त्यानंतर नक्षल्यांशी झालेल्या वाटाघाटीत ईरपाने घोळ केल्याचा संशय नक्षल्यांना होता. त्यातूनच ही हत्या झाल्याचे बोलले जाते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी