शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ढोल, नगाऱ्याच्या तालावर नक्षलवादी थिरकले...; VIDEO व्हायरल, पोलिस अलर्ट

By संजय तिपाले | Updated: September 7, 2023 19:51 IST

छत्तीसगडच्या सीमावर्ती जंगलातील हा व्हिडिओ असल्याने गडचिरोली पोलिस देखील अलर्ट झाले आहेत.

गडचिरोली : घनदाट जंगलात ढोल, नगाऱ्याच्या तालावर नक्षलवादी थिरकतानाचा एक व्हिडिओ ७ सप्टेंबरला समाजमाध्यमात व्हायरल झाला. यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, नक्षल्यांचा बालेकिल्ला असलेल्या बस्तर (जि.छत्तीसगड) येथील जंगलातील हा व्हिडिओ असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बस्तर हा भामरागडला चिकटून असलेला जिल्हा आहे. छत्तीसगडच्या सीमावर्ती जंगलातील हा व्हिडिओ असल्याने गडचिरोली पोलिस देखील अलर्ट झाले आहेत. 

काही महिन्यांपूर्वी बस्तरमध्ये नक्षल्यांनी नवीन दलम सदस्य भरती केले. यात काही युवतींचाही समावेश आहे. नक्षल चळवळीत जोडल्या गेलेले नवे सदस्य ढोल व नगाऱ्याच्या दणदणाटात नृत्य करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या व्हिडिओची पोलिसांनी पडताळणी केली असून त्यात एकही व्यक्ती गडचिरोलीशी संबंधित नाही. मात्र, पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

नक्षल्यांच्या बालेकिल्ल्यातील व्हिडिओ -तीन दशकांपासून गडचिरोली जिल्हा नक्षल्यांच्या रक्तरंजित कारवायांनी होरपळून निघाला. मात्र, आता  नक्षलवादाला पायबंद घालण्यात पोलिसांना बऱ्यापैकी यश आले आहे.   तेलंगण आणि छत्तीसगड सीमा लागून असल्याने या भागात नक्षली कायम सक्रिय असतात. मात्र, गडचिरोली पोलिसांनी आक्रमकपणे अभियान राबविल्यामुळे नक्षल्यांचे मनसुबे धुळीस मिसळले आहेत. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिसdanceनृत्य