शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांचा तळ उध्दवस्थ, चकमकीत एका जवानाला हौतात्म्य; छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलातील घटना

By संजय तिपाले | Updated: February 11, 2025 22:35 IST

छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलातील घटना, हेलिकॉप्टरने उपचारासाठी नेताना सोडला श्वास

 गडचिरोली :  छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी नजीकच्या दिरंगी व फुलणार या गावालगतच्या जंगलात ११ फेब्रुवारीला पोलिस व माओवाद्यांत जोरदार चकमक झाली. यावेळी पोलिसांनी नक्षल्यांचा तळ उध्वस्थ केला. मात्र, चकमकीदरम्यान जिल्हा पोलिस दलाच्या सी- ६० या विशेष पथकातील एक जवान शहीद झाला. महेश कवडू नागुलवार (३९,रा. अनखोडा ता. चामोर्शी) असे हौतात्म्य आलेल्या जवानाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, भामरागड तालुक्यातील शेवटच्या टोकावरील छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या भामरागड तालुक्यातील दिरंगी आणि फुलणार या गावातील जंगल परिसरात माओवाद्यांनी तळ ठोकला होता. याबाबत माहिती प्राप्त होताच गडचिरोली पोलिसांचे नक्षलविरोधी सी- ६० चे १८ पथके आणि सीआरपीएफच्या दोन पथकांच्या जवानांनी १० जानेवारी रोजी या परिसरात नक्षलविरोधी मोहीम राबवली होती. ११ जानेवारी रोजी या परिसराला जवानांनी घेराव टाकला असता घनदाट जंगलात दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला.

यावेळी जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. चकमकीदरम्यान गडचिरोली सी- ६० पथकाचा जवान महेश नागुलवार यांच्या छातीला गोळी लागली. हेलिकॉप्टरने उपाचारासाठी नेताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. चकमकीच्यावेळी २५ ते ३० नक्षलवादी तेेथे उपास्थित असल्याची माहिती असून यात जहाल नक्षल नेता रघुसह काही मोठे कमांडर होते. चकमकस्थळ घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने जवानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नक्षलवाद्यांशी लढा दिला. गेल्या चार वर्षात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या आक्रमक कारवायांमुळे माओवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. चार वर्षांत एकही जवान शहीद झालेला नव्हता. महेश नागुलवार यांची प्राणज्योत मालवल्याची वार्ता कळताच पोलिस दल हळहळले.

दोन चिमुकल्या पितृप्रेमाला पारख्यामहेश नागुलवार हे २०१० मध्ये पोलिस दलात भरती झाले होते. त्यांच्या पत्नी राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून नोकरीला आहेत. त्यांना आदवी (११) व आश्वी (५) अशा दोन मुली आहेत. महेश नागुलवार यांच्या निधनामुळे दोन चिमुकल्या पितृप्रेमाला पारख्या झाल्या आहेत.  

टॅग्स :Soldierसैनिकnaxaliteनक्षलवादी