शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

गडचिरोलीत रस्त्याच्या कामावरील वाहनांची नक्षलवाद्यांकडून जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 4:35 PM

जाळण्यात आलेल्या वाहनांमध्ये २ पोक्लीन,१ ट्रक आणि एका ग्रेडरचा समावेश असल्याची माहिती आहे.

गडचिरोलीएटापल्लीपासून १४ कि.मी अंतरावर एटापल्ली-कसनसूर या मार्गावरील मवेली या गावात रस्ते बांधकामावरील वाहने उभी करण्यात आली होती. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास नक्षलवाद्यांनी या वाहनांची जाळपोळ केल्याची माहिती समोर येत आहे. 

एटापल्ली तालुक्यात (LWE) योजनेअंतर्गत मवेली ते पिपलीबुर्गी या  २० कि.मी अंतराचे रस्ताबांधकाम गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. दिवसभरातील काम आटोपल्यानंतर ही वाहने एटापल्ली- कसनसूर मार्गावर असलेल्या मवेली गावात उभी केली जातात. रविवारी रात्री दीडच्या सुमारास नक्षल बांधकामस्थळी दाखल झाले. स्थानिक कर्मचाऱ्याला झोपेतून उठविले. त्यानंतर काही कळायच्या आत नक्षल्यांनी उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष्य करीत वाहनांची जाळपोळ केल्याचे कळते. 

जाळण्यात आलेल्या वाहनांमध्ये २ पोक्लीन, १ ट्रक आणि एका ग्रेडरचा समावेश असून अंदाजीत अडीच कोटींचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. झालेल्या घटनेसंदर्भात पोलीस विभागाला विचारणा केली असता घटनेला दुजोरा दिलेला आहे. तर, पोलिसांच्या तपासानंतर नेमके किती रुपयांचे नुकसान झाले हे तपासातून निष्पन्न होणार आहे.

दरम्यान, याच मार्गावर घटनास्थळापासून दीड कि.मी अंतरावर दुसर्‍या कंत्राटदाराचे कुदरी (बांडे ) नदीवर पुलाचे काम बांधकाम सुरू आहे. या घटनेनंतर भीतीपोठी येथील काम थांबवण्यात आले असून सर्व वाहने परत नेण्यात आली आहेत. दरम्यना, नक्षल्यांनी दोन दिवसांपूर्वी हालेवारा पोलीस मदत केंद्रातील एका व्यक्तीची हत्या केल्यानंतर ही दुसरी घटना घडवून आणल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीgadchiroli-acगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारी