शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

Naxalite : खोब्रामेंढा जंगलातील चकमकीत पाच नक्षलवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 12:58 IST

Naxalite : सोमवारी सकाळी ७.३० ते ८ च्या सुमारास त्याच परिसरात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी पोलिसांच्या गोळीचे शिकार झाले. त्यात ३ पुरूष आणि २ महिला नक्षलवादी असल्याचे समजते.

ठळक मुद्देसोमवारी सकाळी ७.३० ते ८ च्या सुमारास त्याच परिसरात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी पोलिसांच्या गोळीचे शिकार झाले. त्यात ३ पुरूष आणि २ महिला नक्षलवादी असल्याचे समजते.

गडचिरोली : कुरखेडा पोलीस उपविभागांतर्गत येणाऱ्या मालेवाडा परिसरातील खोब्रामेंढा जंगलात सोमवारी (दि.29) सकाळी झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात चकमक उडत आहे. शनिवारी सकाळी पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या पथकात आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. यावेळी नक्षलवाद्यांचा कॅम्प उध्वस्त करत पोलिसांनी घातपाताचा कट उधळून लावला होता. यानंतर त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले. 

सोमवारी सकाळी ७.३० ते ८ च्या सुमारास त्याच परिसरात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी पोलिसांच्या गोळीचे शिकार झाले. त्यात ३ पुरूष आणि २ महिला नक्षलवादी असल्याचे समजते. टीसीओसी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांकडून घातपात घडविण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना मिळाली होती. नक्षलवाद्यांचा तो डाव हाणून पाडण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वाखाली खोब्रामेंढा, हेटाळकसा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित आहेत. ठार झालेल्या पाचही नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूnaxaliteनक्षलवादी