शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

Maharashtra Election 2019; नक्षलवाद नियंत्रणात आणला, पुढील पाच वर्षात पूर्णपणे संपवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 16:19 IST

गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने नक्षलवाद नियंत्रणात आणला आहे, पुढील पाच वर्षात तो पूर्णपणे संपवू, अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे जाहीरपणे दिली.

ठळक मुद्देनक्षलग्रस्त आलापल्लीत घेतली जाहीर सभाअमित शाह यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने नक्षलवाद नियंत्रणात आणला आहे, पुढील पाच वर्षात तो पूर्णपणे संपवू, अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे जाहीरपणे दिली. भाजप उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.यावेळी शाह यांनी आपल्या २० मिनिटांच्या भाषणात एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहप्रकल्प लवकरच सुरू होणार असून त्यात ८५ टक्के स्थानिक लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले. मुलचेरा तालुक्यातील चेन्ना प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे, तो प्रकल्प लवकरच सुरू होईल. वैनगंगा नदीवर ठिकठिकाणी बॅरेज बांधून सिंचनाची व्यवस्था केली जाईल. तसेच बल्लारशहा-एटापल्ली रेल्वेमार्ग उभारण्याचे आश्वासनही शाह यांनी आपल्या भाषणात दिले.जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला भाजपने संविधानिक मान्यता दिल्याचे ते म्हणाले. आदिवासी शहीद जवानांसाठी मोठे स्मारक बनविणार असून नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील कॅन्सरच्या रुग्णांना उपचारासाठी मुंबईला जावे लागू नये म्हणून येथेच कॅन्सरच्या उपचाराची सुविधा देण्याचे आश्वासन शाह यांनी दिले.यावेळी मंचावर खासदार अशोक नेते, भाजपचे विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, आ.रामदास आंबटकर, जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, अहेरीतील उमेदवार आ.अम्ब्रिशराव आत्राम, गडचिरोलीचे उमेदवार आ.डॉ.देवराव होळी, आरमोरीचे उमेदवार आ.कृष्णा गजबे, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, अहेरीच्या नगराध्यक्ष वर्षा ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या माजी प्रदेश सचिव सगुणा तलांडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा पहिल्यांदाच नक्षलग्रस्त भागात आल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त लागला होता. ही सभा निर्विघ्नपणे पार पडल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

इथेही ‘शरदराव’अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचा उल्लेख आपल्या भाषणात आवर्जुन केला. शरदराव, तुम्ही ५० वर्षात केले नाही ते आम्ही ५ वर्षात केले, असे सांगत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपचाच कारभार सरस असल्याचे सांगितले. शाह यांनी तीन वेळा पवारांचे नाव घेतले. त्यामुळे भाजपला स्पर्धक म्हणून काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस जास्त महत्वाची वाटत असावी, अशी चर्चा श्रोत्यांमध्ये उमटत होती.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहा