शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल कमांडर 'भास्कर'ला कंठस्नान, तीन दिवसांत सात माओवादी ठार

By संजय तिपाले | Updated: June 7, 2025 17:40 IST

छत्तीसगड सीमेवर चकमक : पाच जणांची ओळख पटेना

संजय तिपालेगडचिरोली :  छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ५ जूनपासून चकमक सुरु आहे. तीन दिवसांत सात माओवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. पहिल्याच दिवशी सहा राज्यांतील वाँटेड व तीन कोटींचे बक्षीस असलेला केंद्रीय समिती सदस्य नरसिंहचलम उर्फ ​​सुधाकर उर्फ ​​गौतम (६९) याचा खात्मा करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी तेलंगणा राज्य समिती सदस्य व नक्षल कमांडर भास्कर उर्फ ​​मैलारापू अडेल्लू (४५) याच्यासह दोन महिला माओवाद्यांना तर ७ जून रोजी आणखी तीन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

भास्करच्या डोक्यावर ४५ लाख रुपयांचे बक्षीस होते. तो चळवळीत टॉप कमांडर म्हणून परिचित होता. नक्षलवादी संघटनेच्या धोरणात्मक कारवायांमध्ये त्याचा सहभाग असे. भास्कर अनेक मोठ्या घटनांचा सूत्रधार असल्याने सुरक्षा दलांसाठी हे मोठे यश मानले जात आहे.  छत्तीसगडमधील बिजापूरच्या घनदाट जंगलात असलेल्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात  सुरु असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांनी आतापर्यंत सात जणांना निशाणा बनवले.  ६ रोजी रात्री उशिरा भास्करची ओळख पटली. तथापि, अद्याप पाच जणांची ओळख पटलेली नाही. सुरक्षा दलांच्या पथकांनी परिसराला सर्व बाजूंनी वेढा घातला असून शोध मोहीम अजूनही सुरू आहे.  बिजापूर पोलिस व केंद्रीय सुरक्षा बलाचे जवानांकडून नक्षलविरोधी मोहीम अजून गतिमान करण्यात आली आहे.   

अत्याधुनिक शस्त्रे जप्त

चकमकीनंतर सैनिकांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त केले. यामध्ये एके-४७, इन्सास रायफल्स, देशी बनावटीचे पिस्तूल, ग्रेनेड, वायरलेस सेट आणि नक्षल साहित्यांचा समावेश आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख आणि गुन्हेगारी रेकॉर्डची पुष्टी करण्यासाठी फॉरेन्सिक आणि गुप्तचर पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. तीन दिवसांत काय घडले ?५ जून :केंद्रीय समिती सदस्य   सुधाकर उर्फ ​​गौतमचा खात्मा६ जून: तेलंगणा राज्य समिती सदस्य भास्करला कंठस्नान, दोन महिला माओवादी सदस्यांचे मृतदेह सापडले७ जून :   तीन पुरुष नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश 

जवानांना सर्पदंश, मधमाशांचा चावा या मोहिमेदरम्यान   सुरक्षा दलाच्या काही कर्मचाऱ्यांना साप चावणे, मधमाशीचा दंश झाला. डिहायड्रेशन व मोहिमेदरम्यान देखील काही जवान जखमी झाले. त्या सर्वांना योग्य ते उपचार सुरु असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. कठीण परिस्थितीवर मात करुन जवान माओवाद्यांविरुध्द लढत आहेत. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली