शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगड सीमेवर जवानांनी केला नक्षली तळ उध्दवस्थ

By संजय तिपाले | Updated: June 6, 2024 12:17 IST

जोरदार धूमश्चक्री: स्फोटके नष्ट, तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून पैसे उकळण्याचा होता डाव

गडचिरोली : तेंदूपत्ता कंत्राटदारांची बैठक बोलावून पैसे उकळण्याचा नक्षल्यांचा डाव उधळून लावत जवानांनी त्यांचा तळ उध्दवस्थ केला. यावेळी घातक स्फोटके घटनास्थळीच नष्ट केली. नक्षल्यांनी केलेल्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. छत्तीसगड सीमेवरील सावरगावजवळील घनदाट जंगलात ५ जूनला सायंकाळी हा थरार घडला.

महाराष्ट्र -छत्तीसगड सीमेवर ५ जून रोजी दुपारी टिपागड व कसनसूर दलमचे सदस्य सावरगाव अंतर्गत कुलभट्टी गावाजवळील डोंगरावर तेंदूपत्ता कंत्राटदारांची बैठक बोलावून पैसे उकळण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाली होती. अपर अधीक्षक कुमार चिंता यांना त्यांनी सी- ६० जवानांसह नक्षलविरोधी अभियान राबविण्यासाठी रवाना केले. महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवरील सावरगाजवळ जवानांनी शोधमोहीम सुरु केली. सायंकाळी नक्षलवाद्यांनी जवानांवर  अंदाधुंद गोळीबार सुरू केला, यानंतर जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी   पळून जाण्यात यशस्वी झाले.

त्यानंतर परिसरात झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात   तारा, बॅटरी, सोलर प्लेट्स, साहित्य आणि काही पिट्टू बॅग  आढळल्या. त्या जप्त करण्यात आल्या. सुरक्षा दलाचे नुकसान करण्यासाठी कॅम्पजवळ एक चार्ज केलेला आयईडी देखील ठेवण्यात आला होता. ६ जून रोजी सकाळी तो बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या मदतीने नष्ट केला. 

"छत्तीसगड सीमेवर तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून पैसे उकळण्यासाठी नक्षल्यांनी बैठक बोलावली होती. जवानांवर गोळीबार केला, पण जवानांनीही जशास तसे उत्तर दिले. नक्षली कॅम्प उध्दवस्थ करण्यात यश आल्याने नक्षल्यांचा घातपाताचा डाव हाणून पाडण्यात यश आले आहे.  परिसरात नक्षलविरोधी मोहीम अधिक गतिमान केली आहे."- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली