शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

निसर्ग परिचय केंद्र दुरवस्थेत

By admin | Updated: November 8, 2014 01:18 IST

चपराळा अभयारण्यातील हनुमान मंदिर प्रशांतधाम येथे वनविभागाच्यावतीने १९९६ मध्ये निसर्ग परिचय केंद्र बांधण्यात आले.

आष्टी : चपराळा अभयारण्यातील हनुमान मंदिर प्रशांतधाम येथे वनविभागाच्यावतीने १९९६ मध्ये निसर्ग परिचय केंद्र बांधण्यात आले. मात्र वनविभागाच्या दुर्लक्षामुळे सदर निसर्ग परिचय केंद्राची दुरवस्था झाली आहे. या परिचय केंद्राचा विस्तार करून त्या ठिकाणी सेमाना देवस्थानाच्या धर्तीवर विकास करावा, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे. चपराळा येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी विविध भागातून येतात. अभयारण्यातील प्राणी, पक्षी यांची माहिती देणारे विविध कक्ष स्थापन करण्यात यावे, लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे झुले, घसरगुंडी आदी साहित्य लावण्यात यावे, चपराळा येथे वर्षभर असंख्य भाविक दर्शनासाठी तसेच शाळांच्या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थी येतात. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष सुविधा निर्माण कराव्या, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. चपराळा गावाजवळ वैनगंगा-वर्धा नदीचा संगम आहे. पुढे या नद्या प्राणहिता या नावाने ओळखल्या जातात. या ठिकाणीच हनुमान मंदिर प्रशांतधाम प्रेक्षणीय स्थळ आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. जिल्हा प्रशासनाने मार्र्कं डा ते चपराळा अभयारण्यापर्यंत वैनगंगा नदीतून जलपर्यटन प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबरोबरच आष्टी येथील बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील विश्रामगृहाला रिसॉर्ट बनविण्याचा विचारही शासनाने केला होता. त्यामुळे मार्र्कं डा ते चपराळा येथे येणाऱ्या पर्यटकांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था होऊ शकली असती. परंतु सदर कामांना अद्यापही सुरूवात करण्यात आली नाही. लहान मुलांसाठी विविध प्रकारचे खेळणी साहित्य निर्माण केल्यास या भागातील पर्यटनाला वाव मिळेल. (वार्ताहर)वनमंत्री चपराळाच्या विकासाकडे लक्ष देणार काय?चपराळा या अभयारण्याचा पाहिजे तसा विकास झाला नाही. विकासापासून चपराळा अभयारण्य अनेक दिवसांपासून वंचित आहे. राज्यात भाजपप्रणीत सरकार सत्तेत आल्यामुळे नवीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून चपराळा येथील नागरिकांना विकासाची आस आहे. जिल्ह्यात भामरागड व चपराळा हे दोन अभयारण्य आहेत. मात्र दोनही अभयारण्याच्या विकासाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याने चपराळा अभयारण्याच्या विकासाला गती मिळण्यासाठी ते प्रयत्न करणार काय, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत मुलचेरा व चामोर्शी तालुक्यामध्ये चपराळा अभयारण्याचे क्षेत्र पसरले आहे. अभयारण्यात साग, चंदन, बेहडा, येन, पळस, गराडी, खैर, अंजन आदी मौल्यवान वृक्ष आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत चपराळा अभयारण्य २५ फेब्रुवारी १९८६ ला घोषित करण्यात आला. सदर अभयारण्याचे नाव चपराळा या गावावरून ठेवण्यात आले. अभयारण्याची सीमा आष्टी येथील वनविभागाच्या चौकीपासून लगाम नाक्यापर्यंत व नागुलवाही गावापासून रेंगेवाहीपर्यंत एकूण १३४.७८ चौ. किमीपर्यंत पसरली आहे. अभयारण्यात चौडमपल्ली, चपराळा, सिंगनपल्ली, धन्नूर, चंदनखेडी, मार्र्कं डा (क) आदी सहा गावे समाविष्ट आहेत. तसेच २१ गाव अभयारण्याच्या अगदी लगतच्या जंगलात आहेत. वनोपजावरच परिसरातील नागरिकांची उपजीविका अवलंबून आहे. वनविभागाच्या कठोर कायद्यामुळे या परिसरातील नागरिकांचा विकास झाला नाही. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आदी समस्या कायम आहेत. त्यामुळे नवीन वनमंत्र्यांकडून या भागाच्या विकासाची अपेक्षा नागरिकांना आहे.