शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील नाल्या कचऱ्याने तुंबल्या

By admin | Updated: November 10, 2014 22:43 IST

शहरातील बहुतांश नाल्या कचऱ्याने तुंबल्या असून नगर परिषदेचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. नालीतील कचरा जमिनीच्या बरोबर आला असल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

गडचिरोली : शहरातील बहुतांश नाल्या कचऱ्याने तुंबल्या असून नगर परिषदेचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. नालीतील कचरा जमिनीच्या बरोबर आला असल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. शहरातील स्वच्छतेची जबाबदारी सांभाळण्यासाठी नगर परिषदेकडे ५० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. सदर कर्मचारी दररोज नाल्या उपसण्याबरोबच शहरातील कचरा उचलत असल्याची नेहमीच बढाई मारल्या जाते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती याहून भिन्न आहे. शहरातील काही वॉर्डातील नाल्या सहा महिन्यांहून अधिक कालावधी होऊनही उपसण्यात आल्या नाहीत. नगर परिषदेचे पदाधिकारी, नगर सेवक व अधिकारी तसेच कर्मचारी स्वच्छता अभियान राबविण्याविषयी नागरिकांना सल्ले देण्यात व्यस्त आहेत. मात्र शहरात असलेल्या बकाल व्यवस्थेकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. नगर परिषद कार्यालयाच्या समोरच असलेल्य शिवाजी महाविद्यालयासमोरील नाली पूर्णपणे कचऱ्याने तुंबली आहे. नालीतील कचरा पूर्णपणे जमिनीच्या समांतर आला आहे. त्यामुळे या नालीतून पाणी वाहून जाण्यास मार्गच राहला नाही. या भागातील दुकानदार नगर परिषद प्रशासनाला सदर नाली उपसण्याविषयी अनेक वेळा विनंती केली आहे. मात्र नगर परिषदेचा एकही स्वच्छता कर्मचारी आजपर्यंत नाली उपसण्यासाठी इकडे फिरकलाच नाही, असे येथील दुकानदारांनी सांगितले. (नगर प्रतिनिधी)