लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : यावर्षीच्या खरीप हंगामात सुरूवातीपासून पाऊस समाधानकारक येत नसल्याने अद्यापही रोवणीला वेग आला नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, असे शेतकरी रोवणीची कामे करीत आहेत. चामोर्शी तालुक्याच्या कन्हाळगाव-एकोडी दरम्यान एक नाला आहे. या नाल्यालगत असलेली जवळपास ५० हेक्टर शेती मोटारपंप, डिझेल इंजिनद्वारे ओलीत करून रोवणीची कामे सुरू केली आहेत. त्यामुळा हा नाला परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.नाल्याच्या परिसरात कन्हाळगाव व एकोडी या दोन्ही गावातील शेतजमिनी आहेत. पाण्याची कोणतीही सोय या भागात नसल्याने शेतकरी सर्वस्वी नाल्याच्या पाण्यावरच अवलंबून आहेत.विशेष म्हणजे या नाल्यात वर्षभर पाणीसाठा असतो. याचा फायदा घेत अनेक शेतकºयांनी कृषी पंप बसवून शेतात सिंचनाची सोय उपलब्ध केली आहे. नाल्यालगत जवळपास ३० विद्युत मीटर व पंप लावले आहेत. त्यानुसार शेतकरी नाल्यातील पाण्याचा वापर करून खरीपात धान पिकासह उन्हाळ्यात भाजीपाल्याची लागवड करतात. अनेक शेतकऱ्यांनी तर ७०० ते ८०० मीटर लांब पाईपलाईन टाकून नाल्यातील पाणी शेतापर्यंत पोहोचविले आहेत. नाल्यातील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी येथील गाळ उपसून साफसफाई करणे आवश्यक आहे. तेव्हाच नाल्यातील पाणी साठवणूक क्षमता वाढून अन्य शेतकऱ्यांसाठीसुद्धा सिंचनाची सोय होऊ शकते. त्यामुळे येथील नाल्यातील गाळाचा उपसा करून पाणी साठवणुकीसाठी ठिकठिकाणी बंधारे बांधणे आवश्यक आहे. यासाठी वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.उन्हाळ्यातही असते पुरेशे पाणीकळमगाव-एकोडी दरम्यानच्या नाल्यात उन्हाळ्यातही पाणी असते. त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या शेतात भाजीपाल्याचे पीक घेतात. बरेच शेतकरी भाजीपाल्याचे पीक घेत असल्याने त्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी पंप उपलब्ध केल्यास सर्वच शेतकऱ्यांना दुबार पीक घेता येईल.
५० हेक्टर शेतीसाठी नाला ठरतोय वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST
विशेष म्हणजे या नाल्यात वर्षभर पाणीसाठा असतो. याचा फायदा घेत अनेक शेतकºयांनी कृषी पंप बसवून शेतात सिंचनाची सोय उपलब्ध केली आहे. नाल्यालगत जवळपास ३० विद्युत मीटर व पंप लावले आहेत. त्यानुसार शेतकरी नाल्यातील पाण्याचा वापर करून खरीपात धान पिकासह उन्हाळ्यात भाजीपाल्याची लागवड करतात. अनेक शेतकऱ्यांनी तर ७०० ते ८०० मीटर लांब पाईपलाईन टाकून नाल्यातील पाणी शेतापर्यंत पोहोचविले आहेत.
५० हेक्टर शेतीसाठी नाला ठरतोय वरदान
ठळक मुद्देसिंचनाद्वारे रोवणीची कामे सुरू : कळमगाव-एकोडीदरम्यानच्या शेतीसाठी आधार