शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

‘त्या’ १.१२ कोटीच्या रकमेचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:01 IST

तहसीलदार कल्याणकुमार डहाट आणि स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांसमक्ष त्या रकमेची मोजणी केली असता वाहनात १ कोटी १२ लाख रुपयांची रोकड आढळून आली. सदर रक्कम तेंदूपत्त्याची मजुरी देण्यासाठी नेली जात असल्याचे सांगण्यात आले असले तरी त्यावर पोलिसांनी अद्याप तरी विश्वास ठेवलेला नसल्याचे दिसून येते. या प्रकरणाचा तपास सुरूच असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतनसिंह चौहान यांनी शुक्रवारी सायंकाळी सांगितले.

ठळक मुद्देचौकशी सुरूच : २४ तासानंतरही निष्कर्ष नाही

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गोंदियाकडून एका वाहनातून आलेल्या १ कोटी १२ लाख रुपयांच्या रकमेचे गूढ उकलण्यात आरमोरी पोलिसांना २४ तासानंतरही यश आले नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गांभिर्य आणखीच वाढले असून ही रक्कम नेमकी कुठे आणि कशासाठी जात होती हे याचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.देसाईगंज मार्गावरील कोसा विकास केंद्राजवळ नाकेबंदीदरम्यान गुरूवारी (दि.११) आरमोरी पोलिसांनी गोंदियावरून आलेली एमएच ३५, पी ९००१ ही कार पकडली. तपासणी केल्यानंतर आतमध्ये मोठी रोकड मिळाली.तहसीलदार कल्याणकुमार डहाट आणि स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांसमक्ष त्या रकमेची मोजणी केली असता वाहनात १ कोटी १२ लाख रुपयांची रोकड आढळून आली. सदर रक्कम तेंदूपत्त्याची मजुरी देण्यासाठी नेली जात असल्याचे सांगण्यात आले असले तरी त्यावर पोलिसांनी अद्याप तरी विश्वास ठेवलेला नसल्याचे दिसून येते. या प्रकरणाचा तपास सुरूच असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतनसिंह चौहान यांनी शुक्रवारी सायंकाळी सांगितले.सिरोंचा येथे नक्षल्यांसाठी जात असलेली रक्कम पकडल्यानंतर सर्वच ठिकाणचे पोलीस सक्रिय झाले आहेत.कारमध्ये ग्रामसभांची रक्कम बुडविणारा कंत्राटदारपोलिसांनी जप्त केलेल्या त्या कारमध्ये संजय किशोर टेहर (५४), स्नेहल बिपीनभाई पटेल (४५), समीर कयुम कुरेशी तिघेही रा.गोंदिया हे तिघे होते. यापैकी स्रेहल पटेल हे तेंदू कंत्राटदार असून त्यांनी २०१७ मधील कंत्राटापोटी ५ ग्रामसभांची ६ कोटी रुपयांची रॉयल्टी अद्याप दिलेली नाही. त्यासाठी वनविभागाने सदर कंत्राटदाराचे हे वाहनही गडचिरोलीच्या वन नाक्यावर अडविले होते. शुक्रवारी ते जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सोडून दिल्याचे समजते. त्याच प्रकरणातील कंत्राटदाराला आता एवढ्या मोठ्या रकमेसह आरमोरीत पकडण्यात आले.

टॅग्स :MONEYपैसाforest departmentवनविभाग