गडचिराेली : काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे नर्सेसचे कर्तव्य किती महत्त्वाचे हे अधाेरेखित झाले आहे. नर्सेस आपले जीवन धाेक्यात घालून दुसऱ्याचे प्राण वाचविण्याचे कार्य करीत आहे. अशाप्रसंगी त्यांच्या जीवाला सुद्धा धाेका हाेऊ शकताे. हे सत्य असताना त्याचा विचार न करता रुग्णसेवेतील त्यांचे काम प्रेरणादायी आहे. काेविड सेंटरमधील त्यांचे कार्य पाहता त्यांना देवदूत म्हणणे याेग्य ठरेल. नागरिकांनीही लस घेऊन प्रतिकार शक्ती वाढवावी व अफवांना बळी पडू नये, असे आवाहन डाॅ.साळवे नर्सिंग काॅलेजचे संस्थापक डाॅ.प्रमाेद साळवे यांनी केले.
डाॅ.साळवे नर्सिंग काॅलेजच्या विद्यार्थिनींनी नर्सेस डे चे औचित्य साधून कटेझरी येथे लसीकरण सर्वेक्षण जनजागृती कार्यक्रम घेतला. या निमित्ताने विद्यार्थिनींनी कटेझरी येथील प्रत्येक घरी भेट देऊन कुटुंबातील व्यक्तींची चाैकशी केली. घरातील व्यक्तींना काही आजार आहे काय, किती लाेकांनी लस घेतली, याबाबत माहिती घेऊन काेराेना प्रतिबंधात्मक लस घेण्याबाबत जनजागृती केली. तसेच आहार-विहार, याेग, व्यायाम याबाबत माहिती देऊन आराेग्य जपण्याचे आवाहन केले. सदर सर्वेक्षणात राेजा आत्राम, शीतल पदा, उज्ज्वला ताडाम, वनश्री ताजगाये, नंदिनी मडावी, वैशाली मडावी, प्रांजली वल्के, करिष्मा मेश्राम, प्रतिमा रामटेके, साक्षी मडावी, अबाेली त्रिशुले, शीतल नान्हे, पायल मडावी, प्रियंका तलांडी, शीतल रामटेके, प्राजी नंदेश्वर, पूनम वटी, पूजा रामटेके, पूजा भांडेकर, कुमूद साेरते, निकिता सडमेक, मयुरी गडपायले, ट्विंकल सयाम, तेजस्विनी काेडवते, संध्या लाेंहबळे, अर्चना तुलावी यांच्यासह अन्य विद्यार्थिनी सहभागी झाल्या.