शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगर पालिकेने मूलभूत सुविधा पुरविण्यास प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:01 IST

नगर परिषदेमार्फत सुमारे ५३ लाख रुपये खर्चुन स्मशानभूमीत विविध सुविधांची निर्मिती केली जात आहे. याबाबतचे वृत्त २२ जून रोजी प्रकाशित केले. त्यानंतर आरमोरी येथील नागरिकांनी नगर परिषदेच्या कारभाराबाबत टीका केली आहे. आरमोरी शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. नवीन वस्त्यांमध्ये नाल्या, वीज, पाणी, रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा नाहीत.

ठळक मुद्देआरमोरीवासीयांची मागणी : स्मशानभूमी विकासावर अनेकांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : येथील स्मशानभूमीत सुविधा पुरविण्यासाठी नगर परिषदेने सुमारे ५३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. स्मशानभूमीत सुविधा निर्माण करण्याऐवजी शहरात मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी नगर परिषदेने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आरमोरीवासीयांकडून होत आहे.नगर परिषदेमार्फत सुमारे ५३ लाख रुपये खर्चुन स्मशानभूमीत विविध सुविधांची निर्मिती केली जात आहे. याबाबतचे वृत्त २२ जून रोजी प्रकाशित केले. त्यानंतर आरमोरी येथील नागरिकांनी नगर परिषदेच्या कारभाराबाबत टीका केली आहे. आरमोरी शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. नवीन वस्त्यांमध्ये नाल्या, वीज, पाणी, रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा नाहीत. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विकास कामांची मागणी केल्यास निधी नसल्याचे कारण नगर परिषदेकडून सांगितले जाते. मात्र अनावश्यक बाबींवर खर्च केला जात असल्याचे दिसून येते.आरमोरी येथे ग्रामपंचायत असतानाच स्मशानभूमीचा विकास करण्यात आला. या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र केवळ चार वर्षातच पुन्हा दुरूस्तीच्या कामांना व वाढीव बांधकामांसाठी ५३ लाख रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची बोंब असताना अनावश्यक बाबींसाठी निधीची उधळण केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.बांधकामांचे रिंग करण्याचे प्रमाण वाढलेकोणत्याही बांधकामाची ई-निविदा काढून कमीतकमी किमतीला जो कंत्राटदार काम करण्यास तयार होईल, त्या कंत्राटदाराला काम दिले जाते. या स्पर्धेत कधीकधी २० ते २५ टक्के बिलोवर काम घेतले जाते. यामुळे कंत्राटदारांना फारसा नफा मिळत नाही. त्यामुळे नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांनाही देणगी मिळत नाही. परिणामी कामांचे रिंग करण्याचे प्रकार आरमोरी नगर परिषदेत वाढीस लागले आहेत. यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. कंत्राटदारांनी संघटना स्थापन केली आहे. नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून बांधकामांचे रिंग केली जात आहे. या प्रकारावर आळा घालण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Socialसामाजिक