शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्री पद्धत लागवडीच्या क्षेत्रात होणार वाढ

By admin | Updated: May 27, 2014 00:48 IST

जिल्हा अधीक्षक व कृषी अधिकारी व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सन २०१४-१५ चे खरीप नियोजनाचा आराखडा तयार केला आहे. सोमवारी जिल्हाधिकारी

खरीप आढावा : भाजीपाला व फुलशेतीस प्रोत्साहन

गडचिरोली : जिल्हा अधीक्षक व कृषी अधिकारी व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सन २०१४-१५ चे खरीप नियोजनाचा आराखडा तयार केला आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी आढावा घेतला. नियोजनानुसार यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १५ हजार ५०० हेक्टरमध्ये श्री पद्धतीने भात लागवड करण्यात येणार आहे. कृषी विभागाने याबाबतचे लक्ष १०० हेक्टरचे ठेवले आहे. कृषी विभागाच्यावतीने दरवर्षी भात लागवडीच्या श्री पद्धतीबाबत जनजागृती करण्यात येते. गतवर्षीपासून जिल्ह्यात श्री लागवड पद्धतीत वाढ होत आहे. शेती क्षेत्राचा झपाट्याने विकास होऊन उत्पादन वाढावे यासाठी जि. प. च्या कृषी विभागाने यंदा भात लागवडीचे ५० यंत्र खरेदी केले आहेत. या यंत्राच्या सहाय्याने यंदाच्या खरीप हंगामात ५०० हेक्टर क्षेत्रात भात लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात दुबार पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली असून यंदा ७७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रामध्ये दुबार पेरणी करण्यात येणार आहे. अ‍ॅपल बोर, केळी, पपई, पेरू आदी फळाच्या पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ३ हजार १० हेक्टर क्षेत्रामध्ये फलोत्पादन करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी केवळ भाताच्या शेतीवर अवलंबून राहू नये, बारमाही शेती करून प्रगती साधावी, या हेतूने कृषी विभागाने जिल्ह्याच्या भाजीपाला लागवडीच्या क्षेत्रात वाढ करण्याचे नियोजन केले आहे. अहेरी उपविभागात यंदा १ हजार ५५० हेक्टर, गडचिरोली उपविभागात ३ हजार ८७५ हेक्टर तसेच देसाईगंज व अहेरी भागात ७ हजार ७५० हेक्टर क्षेत्रात भाजीपाला पिकाची लागवड करण्यात येणार आहे. कृषी विभागाने फुलशेतीस प्रोत्साहन देण्यासाठी यंदा फुलशेती लागवडीचे लक्षांक २ हेक्टर इतके ठेवले आहे. झेंडू, मोगरा, शेवंती, गॅलॉर्डीया, गुलाब आदी फुलशेतीची लागवड ३१० हेक्टर क्षेत्रामध्ये होणार आहे. कृषी विभागाने खरीप हंगामासाठी बियाणे व खताचे नियोजनही केले आहे. पुरेशा प्रमाणात शेतकर्‍यांना बियाणे व खते उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे कृषी अधिकार्‍याच्यावतीने यावेळी आढावा बैठकीत सांगण्यात आले. बैठकीला जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. व्ही. सी. कुडमुलवार, जि. प. चे कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर, कृषी अधीक्षक कार्यालयाचे तंत्र अधिकारी दिक्षीत तसेच उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)