जि.प. समोर धरणे : संस्थाचालक , विमाशि संघ, शिक्षक भारती, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद आदींचा पाठींबागडचिरोली : राज्य शासनाने २८ आॅगस्ट २०१५ रोजी शाळा संच मान्यतेच्या बाबत काढलेल्या अन्यायकारक जीआरच्या निषेधार्थ व मुख्याध्यापकांच्या विविध मागण्यांसाठी शनिवारी जिल्हा परिषदसमोर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व मुख्याध्यापक संघाचे सचिव तेजराव बोरकर, अध्यक्ष संजय नार्लावार, उपाध्यक्ष सी. एल. डोंगरवार, महेश तुमपल्लीवार, कोषाध्यक्ष संजय भांडारकर यांनी केले. या आंदोलनाला संस्थाचालक संघटना, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद संघटना, शिक्षक परिषद संघटना, विना अनुदानित शिक्षण संस्थाचालक संघटना, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांनी पाठींबा दर्शविला. याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, शिक्षण संस्थाचालकांनी विद्यमान केंद्र व राज्य शासनाकडून सुरू असलेल्या अन्यायकारक शैक्षणिक धोरणाचा निषेध केला. अन्यायकारक धोरणामुळे आदिवासी बहूल दुर्गम गडचिरोली जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा चालविणे कठीण होत असल्याची बाब भाषणातून यावेळी मांडली.या आंदोलनात संस्थाचालक संघटनेचे पदाधिकारी सुधीर भातकुलकर, किशोर वनमाळी, माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, बबलू हकीम, प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, राजेंद्र लांजेकर, प्राचार्य लिना हकीम, कविता पोरेड्डीवार, विलास बल्लमवार, जयंत येलमुले आदी उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापक संघाचे सहसचिव एस. आर. वट्टे, प्रल्हाद मंडल, व्ही. आर. पुस्तोडे, मनिष शेटे, मुकूंद म्हशाखेत्री, राजेंद्र मेश्राम, आनंद गेडाम, सुखलाल रामटेके, गजानन लोनबले, शैलेंद्र खराती, सूर्यकांत सोनटक्के, संजीव गोसावी, सागर म्हशाखेत्री, नारायण वैद्य, प्रेमलाल सहारे, डी. के. मेश्राम, गुलाब वसाके, अर्पना गुंडपवार, जयश्री लोखंडे, विद्या आसमवार, लक्ष्मी मने आदीसह जिल्ह्यातील शाळांचे बहुसंख्य मुख्याध्यापक उपस्थित होते. मुख्याध्यापक संघाच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
मुख्याध्यापक संघाचे राज्य शासनाच्या अन्यायकारक जीआरविरोधात आंदोलन
By admin | Updated: September 20, 2015 01:54 IST