शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

आपत्ती व्यवस्थापनावर मान्सूनपूर्व आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:47 IST

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोलीद्वारा आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठक सोमवारी (दि.१३) जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पाडली. जिल्ह्यातील संभाव्य पूरपरिस्थिती, वीज पुरवठा, औषधोपचाराच्या सुविधा अशा अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर यावेळी चर्चा करून अधिकाऱ्यांनी योग्य त्या सूचना दिल्या.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती : पूरपरिस्थितीदरम्यान सुरक्षित ठिकाणांची खातरजमा करण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोलीद्वारा आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठक सोमवारी (दि.१३) जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पाडली. जिल्ह्यातील संभाव्य पूरपरिस्थिती, वीज पुरवठा, औषधोपचाराच्या सुविधा अशा अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर यावेळी चर्चा करून अधिकाºयांनी योग्य त्या सूचना दिल्या.या सभेस जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, आपत्ती व्यवस्थापन केंद्र यशदा पुणेचे संचालक व्ही.एन. सुपणेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, अप्पर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील आदींसह महसूल, आरोग्य, पोलीस, बांधकाम, पाटबंधारे, सिंचन, महावितरण, दूरसंचार, परिवहन, पंचायत, नगरपालिका प्रशासनाशी संबंधित विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांचे सादरीकरण या सभेत केले. गडचिरोली जिल्हा हा नद्यांचे विस्तृत जाळे असलेला भाग असून नजीकच्या गोसेखुर्द, इटियाडोह, वर्धा प्रकल्प इ. धरणांमधून सोडणारे विसर्गाचे पाणी व अतिवृष्टी इत्यादीमुळे वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती, पर्लकोटा, बांडिया इ. नद्यांना पूर येतो. त्यामुळे शेकडो गावांचा संपर्क तुटतो.पावसाच्या दिवसात गर्भवती स्त्रियांना योग्य औषधोपचार मिळावा आणि योग्यवेळी दवाखान्यात भरती करण्यासंदर्भात प्राधान्याने आराखडा बनविण्यात यावा. विद्युत पुरवठा अखंडीत ठेवणेसंदर्भात आवश्यक कार्यवाही करावी. पुलावरु न पाणी वाहत असतानाा वाहतूक प्रतिबंधित करण्यात यावी. पावसाळयादरम्यान खंडीत गावातील तसेच पूरग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा तात्काळ मिळाव्या. पूरपरिस्थिती दरम्यान स्थलांतरीत करावयाच्या सुरिक्षत ठिकाणांची खातरजमा करण्यात यावी. केंद्रीकृत नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात यावे. डीएम सेलद्वारा दिले जाणारे अलर्ट प्रत्येक गावापर्यंत दवंडीद्वारे देण्याची कार्यवाही महसूल व पंचायत विभागाद्वारे करण्यात यावी आदी निर्देश संबंधित अधिकाºयांना देण्यात आले. सर्व संबंधित विभागांचे नियंत्रण कक्ष हे दिवसाचे २४ तास कार्यान्वित ठेवून जिल्हा नियंत्रण कक्षाशी समन्वय साधावा, अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.शाळांच्या सुटीचे अधिकार तहसीलदारांनाजिल्हाधिकारी सिंह म्हणाले, पूरपरिस्थिती असताना वा अतिवृष्टी, नद्यांची पातळी वाढल्यामुळे पुराची शक्यता जाणवल्यास संबंधित भागातील शाळांना सुटी घोषित करण्यासंदर्भात यापूर्वीच तहसीलदारांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत, त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असताना वाहतुकीला प्रतिबंध घालावा, तसेच पुलाच्या दोन्ही बाजुला इशारा सूचना फलके लावण्यात यावी. आपत्तीनिहाय हॉटस्पॉट्स ओळखून त्याप्रमाणे आवश्यक ठिकाणी संसाधनांची उपलब्धता करण्यात यावी, असेही ते म्हणाले.विविध विभागांना अधिकाऱ्यांच्या सूचनाकम्युनिटी बेस्ड आपत्ती व्यवस्थापन पथके तयार करु न त्यांचेमार्फत ग्रामपातळीवर कार्यवाही झाल्यास आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जलद प्रतिसाद शक्य होईल, अशी सूचना यावेळी आपत्ती व्यवस्थापन केंद्र यशदाचे सुपणेकर यांनी केली.जिल्हा पोलीस अक्षीक्षक म्हणाले, खाजगी डोंगा/बोट यावर पावसाळ्यादरम्यान आवश्यक ते नियंत्रण ठेवण्यात यावे. त्याचे पालन न झाल्यास वेळप्रसंगी त्यांचेवर कारवाई करण्यात यावी. तसेच दुर्गम भागात बसेसचे नियोजन योग्यप्रकारे करावे असे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राठोड यांनी स्वच्छता विभाग व आरोग्य विभागाचे अधिकारी यांना पिण्याचे पाण्याचे निर्जंतुकीकरण तसेच पावसाळ्यादरम्यान खंडीत होणाºया भागांमध्ये पुरेसा औषधांचा साठा आधीच करण्यासंदर्भात निर्देश दिले. पशुधनाकरिता आवश्यक औषधांचा साठा ठेवण्यासंदर्भात संबंधित अधिकाºयांना निर्देश दिले.