शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
3
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
4
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
5
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
6
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
7
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
10
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
11
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
12
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
13
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
14
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
15
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
16
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
17
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
18
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
19
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...

आमदार, खासदारांच्या कार्यालयासमोर घंटानाद

By admin | Updated: July 13, 2015 01:44 IST

जिल्हा युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या वतीने जिल्ह्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी रविवारी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार...

गडचिरोली : जिल्हा युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या वतीने जिल्ह्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी रविवारी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त्व युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, जिल्हा काँग्रेसचे महासचिव सतीश विधाते, युवक काँग्रेसचे महासचिव महेंद्र ब्राह्मणवाडे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड यांनी केले. रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरातील व परिसरातील युवक काँग्रेस व एनएसयूआयचे कार्यकर्ते येथील विधाता मेडिकलसमोर गोळा झाले. त्यानंतर येथून दुपारी १ वाजता शेकडो कार्यकर्ते खा. अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर घंटानाद करीत पोहोचले. दरम्यान खा. अशोक नेते यांनी प्रवेशद्वारावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मागण्यांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर दुपारी १.३० वाजताच्या सुमारास खा. अशोक नेते यांच्या कार्यालयातून चामोर्शी मार्गे इंदिरा गांधी चौकातून धानोरा मार्गावरील आ. डॉ. देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकत्यांनी घंटानाद आंदोलन सुरू केले. दरम्यान युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात घोषणा दिल्या. मात्र यावेळी आ. डॉ. देवराव ेहोळी कार्यालयात उपस्थित नव्हते. कार्यक्रमानिमित्त ते बाहेरगावी असल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहायकाकडून पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांचे स्वीय सहायक दिलीप म्हस्के यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी भाजप पदाधिकारी अविनाश महाजन उपस्थित होते. या घंटानाद आंदोलनात अमिता मडावी, लता पेदापल्ली, दीपक ठाकरे, अमोल भडांगे, भाष्कर बुरे, गौरव अलाम, आकाश सादुलवार, नितेश बाळेकरमकर, दर्शन वालदे, आकाश बगेल, राहूल मुनघाटे, संतोष फरकाळे, राहूल म्हस्के, दिलीप चौधरी, रिना टेकाम, वैशाली कुमरे, बाळू मडावी, प्रशांत शेंडे, प्रफुल आचले, वृषभ धुर्वे, सौरभ म्हशाखेत्री आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)महत्त्वाच्या प्रश्नांवर पाठपुरावा करणार- अशोक नेतेघंटानाद आंदोलनप्रसंगी खा. अशोक नेते यांच्या कक्षात युवक काँग्रेस व एनएसयूआयचे प्रमुख पदाधिकारी व खासदारांमध्ये विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. धानोरा तालुक्यातील जवळपास २० गावांमध्ये इंटरनेट कनेक्टीव्हीटी व मोबाईल क व्हरेज नाही. मात्र या गावातील विकास कामांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ई- निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे काम घेणाऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. इंटरनेटचा अभाव असलेल्या क्षेत्रातील कामांना ई-निविदा प्रक्रियेतून वगळण्यात यावे, अशी मागणी युवक काँग्रेसचे महासचिव पंकज गुड्डेवार यांनी केली. तसेच यावेळी ओबीसी आरक्षण, पेसा कायद्याबाबत राज्यपालांच्या अधिसूचनेच्या सुधारणेबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान खा. अशोक नेते यांनी जिल्ह्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण येत्या अधिवेशनात आवाज उठविणार असून सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपला शासनाकडे पाठपुरावा कायम राहिल, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले. चर्चेप्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमेश भुरसे उपस्थित होते.