आमदारांची मध्यस्थी : रविवारी काम सुरू होणार गडचिरोली : जिल्हा सामान्य रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नितेश वनकर यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. याची दखल घेऊन आमदार डॉ. देवराव होळी यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची संघटना मॅग्मोचे प्रतिनिधी व पदाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, पोलीस उपअधिक्षक गृह गणोश बिरादार यांच्याशी बैठक घडवून आणली. या बैठकीत मारहाण करणाऱ्या आरोपीस १४ आॅगस्टच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत अटक करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घेतले. उद्या १४ आॅगस्टपासून सर्व वैद्यकीय अधिकारी आपल्या कर्तव्यावर रूजू होतील, असे आश्वासन मॅग्मो संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या समावेत डॉ. सुनिल मडावी, डॉ. किरण मडावी, डॉ. प्रविण किलनाके, डॉ. नंदकुमार माळाकोळीकर, डॉ. मंगेश बेले, डॉ. सचिन हेमके, डॉ. पंकज हेमके, डॉ. संजय कन्नमवार, डॉ. नितेश वनकर आदी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन स्थगित
By admin | Updated: August 14, 2016 01:29 IST