शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
3
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
4
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
5
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
6
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
7
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
8
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
9
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
10
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
11
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
12
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
13
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
14
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
15
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
16
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
17
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
18
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
19
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
20
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

घुसखोरी थांबण्यासाठी होणार उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:01 IST

लॉकडाऊनच्या कालावधीत या मार्गाने काही नागरिक जिल्ह्यात प्रवेश करीत होते. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाने रस्त्यावर खड्डा तयार केला होता. मात्र कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केल्याने रस्ता पूर्ववत केला आहे. तेलंगणा राज्यात कामासाठी गेलेले मजूर या मार्गाने परत येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकच्च्या रस्त्यावरून मार्गक्रमण : तहसीलदारांकडून वांगेपल्ली घाटाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : प्राणहिता नदीवरील वांगेपल्ली घाटावरून घुसखोरी होण्याची शक्यता असल्याने अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी या भागाची पाहणी केली.अहेरीजवळ असलेल्या प्राणहिता नदीवरील वांगेपल्ली घाटावर तेलंगणा सरकारमार्फत पुलाचे बांधकाम केले जात आहे. साहित्याची वाहतूक करण्यासाठी कंत्राटदाराने नदी पात्रात कच्चा रस्ता तयार केला होता. लॉकडाऊनच्या कालावधीत या मार्गाने काही नागरिक जिल्ह्यात प्रवेश करीत होते. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाने रस्त्यावर खड्डा तयार केला होता. मात्र कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केल्याने रस्ता पूर्ववत केला आहे. तेलंगणा राज्यात कामासाठी गेलेले मजूर या मार्गाने परत येण्याची शक्यता आहे. अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी व अहेरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे यांनी वांगेपल्ली घाटाला भेट देऊन पाहणी केली. तेलंगणा राज्यात कोरोनाचे रूग्ण आहेत. त्यामुळे या मार्गाने येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्यादृष्टीने उपाययोजना केल्या जाणार आहेत, बांधकामावरील मजूर व कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनेटायझर उपलब्ध करून देण्याचे निर्देश तहसीलदार ओतारी यांनी दिले.

टॅग्स :Socialसामाजिक