गडचिराेली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्यावतीने गडचिराेली शहरात मलनिस्सारण सांडपाण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने बाेरमाळा मार्गावर शुद्धीकरण केंद्राची उभारणी सुरू आहे. नगराध्यक्ष याेगीता पिपरे यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन प्रकल्पाच्या शुद्धीकरण केंद्राची पाहणी केली.
यावेळी भाजप जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमाेद पिपरे, नगरसेविका विष्णू नैताम, लता लाटकर, रंजना गेडाम, नीता उंदीरवाडे, देवाजी लाटकर आदी उपस्थित हाेते. यावेळी प्रकल्पाचे व्यवस्थापक महेश पटेल यांनी सांडपाण्याचा मलनिस्सारण प्रकल्प तसेच शुद्धीकरण केंद्राची विस्तृत माहिती नगराध्यक्ष पिपरे व नगरसेवकांना दिली.
(बॉक्स)
‘ते’ पाणी वापरणार शेतात
या प्रकल्पाद्वारे सांडपाण्याचे शुद्धीकरण करून हे पाणी शेतीसाठी उपयाेगात आणता येणार आहे. तसेच भविष्यामध्ये या पाण्यावर वीज निर्मिती करता येणार आहे. शिवाय मलाद्वारे कम्पाेस्ट खत तयार करता येणार आहे. बहुपयाेगी असलेल्या या मलनिस्सारण प्रकल्पाबाबत शहरातील नागरिक आशावादी आहेत.