शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
5
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
6
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
7
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
8
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
9
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
10
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
11
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
12
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
13
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
14
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
15
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
16
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
17
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
18
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
19
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
20
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना

नक्षलग्रस्त भागात प्रचंड मतदान

By admin | Updated: February 22, 2017 01:52 IST

अहेरी उपविभागातील एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी या चार तालुक्यात १६ जिल्हा परिषद व ३२ पंचायत समितीच्या

दुर्गम भागात शांततेत मतदान : दुसऱ्या टप्प्यात सरासरी ६६.५ टक्के मतदान गडचिरोली : अहेरी उपविभागातील एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी या चार तालुक्यात १६ जिल्हा परिषद व ३२ पंचायत समितीच्या जागांसाठी मतदान पार पडले. दुपारी ३ वाजता मतदान संपले तेव्हा ६६.५ टक्के मतदान झाले, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. अहेरी तालुक्यात ७०.८३ टक्के, सिरोंचा ७३.७९, भामरागड ५७.१९ व एटापल्ली तालुक्यात ६४.१९ टक्के मतदान झाले आहे. अहेरी तालुक्याच्या गुड्डीगुडम येथे ७९ टक्के मतदान झाले आहे. ९६५ मतदारांपैकी ७५८ मतदारांनी येथे मतदानाचा हक्क बजावला. खमनचेरू-नागेपल्ली मतदार संघात तिमरण ग्रामपंचायत अंतर्गत हे मतदान केंद्र येते. तर राजाराम खांदला ग्रामपंचायत अंतर्गत राजाराम-पेरमिली मतदार संघात येणाऱ्या मतदान केंद्रावर ५६३ मतदारांपैकी ६७.५० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिमलगट्टा केंद्र १- ८०.३७, जिमलगट्टा केंद्र २- ७४.३०, गोेविंदगाव ६९.५४, किष्टापूर ६५, अरकापल्ली ७७.७९, रसपल्ली मतदान केंद्रावर ७०.५८ टक्के मतदान झाले. भामरागड तालुक्यातील लाहेरी व मल्लमपोडूर मतदान केंद्रावरील पोलिंग पार्टीला ईव्हीएम मशीनसहित हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नेण्यात आले. सिरोंचा तालुक्यात चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती गणासाठी दुपारी ३ वाजेपर्यंत ७३.७९ टक्के मतदान झाले. तालुक्यातील २१ हजार ३११ महिला व २२ हजार ६७ पुरूष असे एकूण ४३ हजार ३७८ मतदारांपैकी १५ हजार ४४० महिला व १६ हजार १९२ पुरूष असे एकूण ३१ हजार ६६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ७६ पोलिंग पथकापैकी अमडेल्ली व कोप्पेला या संवेदनशील भागातील दोन पथक झिंगानूर बेस कॅम्पला दुपारी ४.३० वाजेपर्यंत पोहोचले. उर्वरित ७४ पोलिंग पथकांपैकी सिरोंचा २० तर बामणीची दोन अशी २२ पथक संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तालुका मुख्यालयात पोहोचली. दुपारी ३ वाजता निर्धारीत वेळेत मतदान संपताच सशस्त्र पोलीस संरक्षणात पोलिंग पथकांनी बेस कॅम्प गाठले. संरक्षण पथकात महिला शिपायांची संख्याही लक्षणिय होती. तालुक्यात आसरअल्ली केंद्रावरील दोन राजकीय कार्यकर्त्यांना स्थानबध्द करण्यात आले. नंदीगाव मतदान केंद्रावरील क्षुल्लक बाचाबाचीनंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून संबंधितांना तंबी दिली. या दोन घटना वगळता कुठेही गोंधळ उडाला नाही. सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर येथे दोन मतदान केंद्रावर अनुक्रमे ७४.५९ व ६१.५३ टक्के मतदान झाले आहे. झिंगानूर ४८/२ या मतदान केंद्रावर ७९५ मतदारांपैकी ५९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ३०२ महिला व २९१ पुरूषांचा समावेश आहे. झिंगानूर ४८/३ या मतदान केंद्रावर ५५९ मतदारांपैकी ३४४ मतदारांनी मतदान केले. यात १४६ स्त्रीया व १९८ पुरूष यांचा समावेश आहे. येथे ६१.५३ टक्के मतदान झाले आहे. दोन्ही टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात. याबाबत अंदाज लावल्या जात आहे. भारतीय जनता पक्ष यावेळी मोठा पक्ष राहिल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. तर अहेरी भागात आविसं व राकाँ अधिक जागांवर कब्जा करण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) पंचायत समिती गणाच्या ईव्हीएममध्ये बिघाड अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा मतदान केंद्रावर पंचायत समितीची गणाच्या ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड निर्माण झाल्याने दीड तास उशीराने मतदान सुरू झाले. येथील जिल्हा परिषद शाळेत भाग १ व भाग २ अशा दोन ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी मशीन ठेवण्यात आले ,त्यात भाग २ मधील पंचायत समिती गणाची मशीन पहिलाच मतदार मतदानासाठी गेला. तेव्हा त्याला मतदान करता आले नाही. त्यामुळे ती नादुरूस्त मशीन बदलविण्यात आली व दीड तास उशीराने मतदान सुरू झाले.