शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
3
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
4
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
5
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
6
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
7
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
8
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
9
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
10
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
11
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
12
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
13
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
14
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
15
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
16
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
17
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
18
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
19
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
20
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग

चोख पोलीस बंदोबस्तात प्रचंड मतदान

By admin | Updated: April 25, 2015 01:46 IST

अहेरी उपविभागातील तीन तालुक्यांमध्ये ५० ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत दुपारी दीड वाजेपर्यंत ५१.०१ टक्के मतदान झाले.

अहेरी/एटापल्ली/सिरोंचा : अहेरी उपविभागातील तीन तालुक्यांमध्ये ५० ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत दुपारी दीड वाजेपर्यंत ५१.०१ टक्के मतदान झाले. अहेरी तालुक्यातील १५५ जागांसाठी ७१ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. एकूण ३८ हजार ७० मतदारांपैकी १७ हजार ६५४ मतदारांनी दीड वाजेपर्यंत मतदान केले. यात ४३ टक्के महिला व ४९.७५ टक्के पुरूष यांचा समावेश होता. सिरोंचा तालुक्यात २२ ग्राम पंचायतींच्या १३८ जागांसाठी ६४ मतदान केंद्रांवर मतदान झाले. २६ हजार १५३ मतदारांपैकी १५ हजार ७७१ मतदारांनी दुपारी दीड वाजेपर्यंत मतदान केले. यामध्ये ५९.८३ टक्के महिला व ६०.७६ टक्के पुरूष मतदारांचा समावेश होता. एटापल्ली तालुक्यात आठ ग्राम पंचायतीच्या ९४ जागांसाठी २८ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. १३ हजार ७३३ मतदारांपैकी ६ हजार ३३७ मतदारांनी दुपारपर्यंत मतदान केले. त्यात ४६.४२ टक्के स्त्रिया तर ४५.८८ टक्के पुरूष मतदारांचा समावेश आहे. सिरोंचा तालुक्यात एका ग्राम पंचायतीत पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. दुपारपर्यंत ८३.५५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. एटापल्ली तालुक्यात ५५ टक्के मतदानएटापल्ली : तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकीत सरासरी एकूण ५५ टक्के मतदान झाले. येमली केंद्रावर ४८.३०, गुरूपल्ली ६५.१४, दिंडवी येथे ७३.२०, ओडेरा ४९.२४, सोहगाव ६६.०३, जारावंडी ६८.९०, बुर्गी ३७.६३, गेदा केंद्रावर ४०.१२ टक्के मतदान झाले. तालुक्यातील येमली येथे चार मतदान बुथ ठेवण्यात आले होते. गुरूपल्ली ग्रा. पं. अंतर्गत गुरूपल्ली व पंदेवाही येथे प्रत्येकी दोन केंद्र ठेवण्यात आले होते. दिंडवी येथे तीन मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. उडेरा व परसलगोंदी येथे प्रत्येकी दोन मतदान केंद्र ठेवण्यात आले. सोहगाव व भापडा येथे प्रत्येकी दोन मतदान केंद्र, जारावंडी व बुर्गी येथे प्रत्येकी तीन, गेदा येथे चार तर चंदनवेली येथे एक मतदान केंद्र ठेवण्यात आला होता. तालुक्यात मतदान केंद्रांवर शांतता व सुव्यवस्था उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ठेवली होती. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संपत खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे काम पाहिले. सिरोंचा तालुक्यातील मतदारांमध्ये प्रचंड उत्साहसिरोंचा : तालुक्यातील मोयाबीनपेठा ग्राम पंचायतीसाठी तीन मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. याठिकाणी ७८.४५ टक्के मतदान झाले. विठ्ठलरावपेठा ग्राम पंचायतीसाठी तीन मतदान केंद्रावर ७१.३४ टक्के मतदान झाले. नरसिंहापल्ली येथे ७४.४८ टक्के मतदान झाले. परसेवाडा येथे ग्राम पंचायतीसाठी ७६.७० टक्के, झिंगानूर ग्राम पंचायतीमध्ये ७६.७३ टक्के, व्यंकटापूर केंद्रावर ६९.६० टक्के, कर्कापेठा मतदान केंद्रावर ७३.९७ टक्के, रंगयापल्ली मतदान केंद्रावर ७३.१० टक्के, नारायणपूर मतदान केंद्रावर ७५.५२ टक्के, मेडाराम (माल) मतदान केंद्रावर ८६.१९ टक्के, आदीमुक्तापूर मतदान केंद्रावर ८२.७४ टक्के, नगरम केंद्रावर ८८.७१ टक्के, रामंजापूर येथे ८५.६२ टक्के, मद्दीकुंठा येथे ९४.५१ टक्के, जानमपल्ली येथे ५९.९० टक्के, पेंटीपाका मतदान केंद्रावर ८३.८१ टक्के, लक्ष्मीदेवीपेठा येथे ८२.७३ टक्के, अंकिसा माल येथे ५८.१० टक्के, आसरअल्ली मतदान केंद्रावर ६४.२२ टक्के, गोलागुड्डम (माल) केंद्रावर ४९.६९ टक्के, सुंकरअल्ली केंद्रावर ८३.०५ टक्के, कोपेला केंद्रावर ७०.५७ टक्के, नरसिंहापल्ली येथे ४०० मतदारांपैकी २७२ मतदारांनी मतदान झाले. तुमनूर (माल) येथील पोटनिवडणुकीसाठी ९२.७५ टक्के मतदान झाले. सिरोंचा तालुक्यात एकूण २७ ग्राम पंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी सिरोंचा (माल) व सिरोंचा रै. या दोन ग्राम पंचायतींची निवडणूक नगर पंचायतीमुळे रद्द झाली. आरडा, चिंतरेवला, तुमलकोंडा येथील निवडणूक बिनविरोध झाली. पातागुड्डम, कोर्लामाल, रमेशगुड्डम, बेजुरपल्ली, कोतापल्ली, टेकडामोटला, नडीकुड्डा, वडधम, सोमनपल्ली, पोचमपल्ली या १० ग्राम पंचायतींमध्ये पोटनिवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल न झाल्याने या ठिकाणी निवडणुकच झाली नाही.झिंगानूर : झिंगानूर ग्राम पंचायतीत एकूण नऊ सदस्य आहेत. त्यापैकी सहा सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली. प्रभाग क्रमांक एकमधील एकूण ५०९ मतदारांपैकी ३९९ मतदारांनी मतदान केले. यात २१३ पुरूष, १८६ स्त्रियांचा समावेश आहे. प्रभागाची मतदान टक्केवारी ७८.३८ टक्के आहे. प्रभाग क्रमांक दोन मध्ये ४५५ पैकी ३३६ मतदारांनी मतदान केले. यात १७२ पुरूष, १६४ स्त्रियांचा समावेश आहे. मतदान टक्केवारी ७३.८४ आहे. प्रभाग क्रमांक तीन मध्ये ४४० मतदारांपैकी ३४३ मतदारांनी मतदान केले. यात १७६ पुरूष व १६७ स्त्रियांचा समावेश आहे. प्रभागाची मतदान टक्केवारी ७७.९५ आहे. झिंगानूर येथे १ हजार ४०४ मतदारांपैकी १ हजार ७८ जणांनी मतदानाचा हक्क बजाविला. गावाची एकूण टक्केवारी ७६.७८ टक्के आहे. सरपंच पद अनुसूचित जमाती महिला उमेदवारांकरिता राखीव आहे. अहेरी तालुक्यातही प्रचंड मतदानअहेरी : अहेरी उपविभागात २० ग्राम पंचायतींसाठी मतदान झाले. ७१ मतदान केंद्रावर १५५ उमेदवारांंच भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. ६६ प्रभागासाठी ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. महागाव (खुर्द) ग्राम पंचायतीकरिता ८०.२९ टक्के मतदान झाले. महागाव (बु.) येथे ८०.९६ टक्के, खमनचेरू येथे ७६.२१ टक्के, बोरी येथे ७७.८६ टक्के, राजपूर पॅच येथे ८०.३३ टक्के, देवलमरी येथे ७१ टक्के, व्यंकटरावपेठा येथे ७९.४२ टक्के, इंदाराम येथे ७८.९९ टक्के, देचली येथे ६६ टक्के, जिमलगट्टा येथे ५८.६१ टक्के, गोविंदगाव येथे ५५.९२ टक्के, मरपल्ली येथे ६५.५६ टक्के, चिंचगुंडी येथे ८५.३८ टक्के, पेरमिलीत ७४.०८ टक्के, मेडपल्लीत ५४.३१ टक्के, वेलगूर येथे ६५.४०, किष्टापूर येथे ७६.१७ टक्के, आलापल्ली येथे ५७.४२ टक्के, नागेपल्ली येथे ८०.३४ टक्के, तिमरम येथे ८३.२८ टक्के मतदान झाले. या ठिकाणच्या पोलिंग पार्ट्या अहेरी येथील बेसकॅम्पवर दाखल झाल्या आहेत. या सर्व निवडणुकींची मतमोजनी २ मे रोजी संबंधीत तहसील कार्यालयामध्ये केली जाणार आहे. एटापल्ली, सिरोंचा व अहेरी तालुक्यातील नक्षलग्रस्त भागामध्ये निवडणुका शांततेत पार पडल्या. दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका ३० एप्रिल रोजी होणार आहेत. त्यामुळे उर्वरित आठ तालुक्यांमध्ये निवडणुका घेण्यासाठी निवडणूक विभाग व पोलीस विभाग आणखी कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)