गडचिरोली : घराच्या सांदवाडीत गांजा उगवून विक्री हाेत असल्याच्या माहितीवरून जिल्हा पाेलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवार, १४ नाेव्हेंबर राेजी छापा टाकून १ काेटी १९ लाख ८३ हजार रुपयांचा गांजा जप्त केला. ही कारवाई कुरखेडा तालुक्यातील हुऱ्यालदंड येथे करण्यात आली. याप्रकरणी आराेपीला अटक करण्यात आली आहे.
कृष्णा हरसिंग बोगा (वय ४१, रा. हुऱ्यालदंड) असे आराेपीचे नाव आहे. कृष्णा बाेगा याने घराच्या सांदवाडीत अवैध पद्धतीने गांजा उगवला व त्याची विक्री करत असल्याची गाेपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. ह्या माहितीवरून पथकाने हुऱ्यालदंड गाठले व कृष्णा बाेगा याच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली. तेव्हा गर्द हिरव्या रंगाची पाने, फुले, बोंडे व बिया संलग्न असलेले कॅनबिस वनस्पती आदी अंमली पदार्थ असा २३९.६६ कि.ग्रॅ. गांजा आढळला. त्याची किंमत १ काेटी १९ लाख ८३ हजार रुपये आहे. सदर गांजा आरोपीने विक्रीच्या उद्देशाने उगवला असल्याचे तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पुराडा पोलिस स्टेशनमध्ये एनडीपीएस १९८५ कलम ८ (सी), २० (बी), २०(बी) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, अधिक तपास मालेवाडा पाेलिस मदत केंद्राचे पीएसआय आकाश नायकवाडी करत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पाेलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात सहायक पाेलिस निरीक्षक समाधान दौंड, पाेलिस अंमलदार रोहित गोंगले, प्रशांत गरफडे, शिवप्रसाद करमे, गणेश वाकडोतपवार,पाेलिस हवालदार संतोष नादरगे व पाेलिस अंमलदार नितेश सारवे यांचा सहभाग हाेता.
Web Summary : Gadchiroli police seized ₹1.19 crore worth of marijuana grown at a home in Huryaldand, Kurkheda. The accused, Krishna Boga, was arrested for cultivating and selling the cannabis. Police found 239.66 kg of marijuana in his house.
Web Summary : गढ़चिरौली पुलिस ने कुरखेड़ा के हुर्यालदंड में एक घर में उगाए गए ₹1.19 करोड़ के गांजे को जब्त किया। आरोपी कृष्णा बोगा को कैनबिस की खेती और बिक्री के आरोप में गिरफ्तार किया गया। पुलिस को उसके घर में 239.66 किलोग्राम गांजा मिला।