शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

मरपल्लीचा युवक बनणार अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:15 PM

नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरी तालुका मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या मरपल्ली या छोट्याशा गावातील रमेश सन्यासी पेरगू या युवकाने एमपीएसीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. एवढेच नाही तर तो अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात दुसरा आला आहे.

ठळक मुद्देएमपीएससीची परीक्षा केली उत्तीर्ण : अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात दुसरा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरी तालुका मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या मरपल्ली या छोट्याशा गावातील रमेश सन्यासी पेरगू या युवकाने एमपीएसीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. एवढेच नाही तर तो अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात दुसरा आला आहे.त्याच्या या यशाबाबत गडचिरोली येथील आकार अ‍ॅकॅडमी येथे खा. अशोक नेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगर परिषदेचे बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार, प्रा. अनिल धामोडे, अ‍ॅड. नीलकंठ भांडेकर, जि. प. सदस्य लता पुंघाटी, संतोष बोलुवार आदी उपस्थित होते.रमेशचे प्राथमिक शिक्षण मरपल्लीतील प्राथमिक शाळेत झाले. सिरोंचा येथील राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालयातून १२ वी उत्तीर्ण केल्यानंतर गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठातून घेतले. रमेश हा अर्थशास्त्र विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. तो नेटसेटसुद्धा उत्तीर्ण आहे. २०१४ मध्ये त्याने पहिल्यांदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. या परीक्षेत त्याला यश मिळाले नाही. मात्र खचून न जाता २०१७ मध्ये पुन्हा परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल ६ जानेवारी रोजी जाहीर झाला. रमेश हा राज्यातून एससी प्रवर्गातून दुसरा आला आहे. शासनाच्या सांख्यिकी अधिकारी, संशोधन अधिकारी अथवा नियोजन अधिकारी या तीन पदांपैकी एका पदावर त्याची वर्णी लागणार आहे. रमेशचे वडील शेतकरी असून रमेशला दोन भाऊ व तीन बहिणी आहेत. मुलांच्या वसतिगृहात राहून त्याने परीक्षेची तयारी केली. त्याचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.