शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनाअभावी मामा तलाव झाले कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

अपेक्षित सिंचनासाठी पुरेसा निधी शासनाकडून उपलब्ध होण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेचा लघुपाटबंधारे विभाग या तलावांचे व्यवस्थापन पाहते. पूर्वी या तलावातील पाण्याचा उपयोग शेतीसाठीच नाही, तर गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही केला जात होता, पण आता त्यातील पाणी शुद्ध राहिलेले नाही. गावातील महिलावर्ग या पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी करतात.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : छोट्या-छोट्या गावतलावांच्या, अर्थात माजी मालगुजारी (मामा) तलावांच्या बाबतीत गोंदिया-भंडारा या जिल्ह्यांप्रमाणेच गडचिरोली जिल्हाही समृद्ध आहे. जिल्हाभरात अशा १६४५ मामा तलावांची नोंद आहे. त्यातील पाण्यातून २५ हजार १९५ हेक्टर शेतीला सिंचन करण्याची क्षमता आहे. मात्र, प्रत्यक्षात यातील बहुतांश तलाव सध्या शेतीच्या सिंचनाऐवजी केवळ गावातील कपडे धुणे आणि गुरांच्या अंघोळीपुरते मर्यादित झाले आहेत. अपेक्षित सिंचनासाठी पुरेसा निधी शासनाकडून उपलब्ध होण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेचा लघुपाटबंधारे विभाग या तलावांचे व्यवस्थापन पाहते. पूर्वी या तलावातील पाण्याचा उपयोग शेतीसाठीच नाही, तर गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही केला जात होता, पण आता त्यातील पाणी शुद्ध राहिलेले नाही. गावातील महिलावर्ग या पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी करतात.

निधी मिळाल्यास वाढू शकते सिंचन

-    या जिल्ह्यात बिगर आदिवासी क्षेत्रातील मामा तलावांमधील साठवण क्षमता वाढविण्यासाठी तलावांचे खोलीकरण, गेट व कालव्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुरेशा निधीची गरज आहे. 

-    हा निधी नसल्यामुळे या तलावांमधून क्षमतेएवढे सिंचन होऊ शकत नाही. वास्तविक मूळ क्षमतेनुसार या तलावांमध्ये ४६ दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे, पण गाळ आणि गेट फुटलेले असल्यामुळे तेवढा पाणीसाठा या तलावांमध्ये होत नाही.

साठवण क्षमता घटलीया पाण्याचा सिंचनासाठी वापर करताना पहिला हक्क अजूनही संबंधित मालगुजार किंवा त्यांनी ज्यांना हक्क दिले त्यांचा आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना या पाण्याचा वापर करता येतो, पण १६४५ मामा तलावांपैकी ३० ते ४० टक्के तलावांमध्ये गाळ साचलेला आहे. त्याचा उपसा झाला नसल्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे.  

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प