दुर्गम भागात हिवताप तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:01:27+5:30

सध्या हिवताप रूग्णांची संख्या वाढत असली तरी आजार पूर्णपणे नियंत्रणात आहे. हिवताप कार्यालयामार्फत ११ हंगामी आरटीडब्ल्यू व १ एसएचडब्ल्यू कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. अतिदुर्गम भागात फवारणीचा कार्यक्रम सुरू असून सर्वेक्षण करून मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले आहे.

Malaria testing in remote areas | दुर्गम भागात हिवताप तपासणी

दुर्गम भागात हिवताप तपासणी

googlenewsNext
ठळक मुद्देकामाचा आढावा : जिल्हास्तरावरील आरोग्य चमू कोटगूल व पिटेसूर भागात पोहोचली

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : जिल्हा हिवताप कार्यालयाची आरोग्य चमू तालुक्याच्या अतिदुर्गम कोटगूल व पिटेसूर भागात पोहोचली व या चमूने नागरिकांची हिवताप तपासणी केली. हिवताप तपासणी दूर राहण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले.
सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. म्हशाखेत्री, जिल्हा माता बाल संगोपण अधिकारी डॉ. समीर बन्सोडे, नोडल अधिकारी डॉ. पंकज हेमंके, कोरचीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी यांनी कोरची येथे हिवताप आजाराबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विषयक कामाचा आढावा घेतला.
यामध्ये तीव्र जोखमीच्या गरोदर माता, रक्तक्षय, इंजेक्शन, आयर्न, सुक्रोज, कमी वजनाची बालके, संस्थात्मक प्रसुती, मलेरियाचा औषधी साठा, कुटुंब कल्याण कार्यक्रम, जन्म, मृत्यू नोंदणी, कीटकजन्य व जलजन्य आदींचा सावेश आहे. त्यानंतर कोटगूल आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या अतिसंवेदनशील पिटेसूर गावामध्ये या आरोग्य अधिकाऱ्यांनी भेट दिली. तेथील ६० लोकांचे रक्तनमुने घेऊन हिवतापाची तपासणी केली. यात एकही रूग्ण हिवताप बाधीत आढळून आला नाही.
दरम्यान लम्बडा कार्यक्रमाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. सध्या हिवताप रूग्णांची संख्या वाढत असली तरी आजार पूर्णपणे नियंत्रणात आहे. हिवताप कार्यालयामार्फत ११ हंगामी आरटीडब्ल्यू व १ एसएचडब्ल्यू कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. अतिदुर्गम भागात फवारणीचा कार्यक्रम सुरू असून सर्वेक्षण करून मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले आहे.गॅरापत्ती येथील आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन तेथील आरोग्यविषयक कामाचा आढावा या आरोग्य पथकाने घेतला. आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील सोयीसुविधांची माहिती जाणून घेतली.

आजाराबाबत अशी घ्या काळजी
गावातील नाली, गटारे आदींची सफाई करणे, यातील पाणी वाहते करणे, आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, मच्छरदाणीचा वापर, गप्पी मासे सोडणे, संपूर्ण घरांची फवारणी करणे आदी उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी हिवतापाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी या भागातील नागरिकांना सांगितले. पावसाळ्यात कोरची तालुक्यात जलजन्य आजार उद्भवू नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने ग्रामस्थांना सदर पाण्याचा पुरवठा करावा, असे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान स्थानिक ग्रा.पं. प्रशासन व आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

Web Title: Malaria testing in remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.