देसाईगंज : गडचिरोली या जंगल व्याप्त जिल्ह्यात वन विभागातील अनेक वस्तूंचा लिलाव करण्यात येतो. कित्येक वेळा वस्तूंचा लिलाव वेगवेगळ्या डेपोमध्ये करण्यात येतो. अशावेळी शेतकऱ्यांना इतरत्र वस्तू हलविण्यास नाहक त्रास सहन करावा लागतो. जेथे डेपो तेथेच लिलाव केल्यास वस्तू घेणे नागरिक व शेतकऱ्यांना सोयीचे होईल. यासंदर्भात तत्काळ निर्देश अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.तसेच सुबाभुळ, नीलगिरी या जातीच्या झाडांना शेड्युल-नॉनशेड्युल ट्रिजमधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे सदर झाडे तोडून त्याची वाहतूक करणे शेतकऱ्यांना सोयीचे झाले आहे. परंतु किनी ही झाडाची प्रजाती शेड्युल-नॉनशेड्युल ट्रिजमधून वगळण्यात न आल्याने सदर झाडाची वाहतूक करणे अत्यंत अडचणीचे झाले आहे. सदर झाडे तोडण्यासाठी परवानगीकरिता शेतकऱ्यांना त्रास होत आहे. सदर किनी झाड प्रजातीला शेड्युल-नॉनशेड्युल ट्रिजमधून वगळण्याची मागणी आ. क्रिष्णा गजबे यांनी विधानसभेत वनमंत्र्यांकडे केली.
वन वस्तंूचा लिलाव डेपोमध्येच करा
By admin | Updated: March 26, 2015 01:25 IST